Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mahim Vidhan Sabha : उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपर्यंत सरवणकर त्यांचा अर्ज मागे घेणार की नाही, यावर राज ठाकरे महायुतीच्या बाजूने प्रचार करणार की, विरोधात हे ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर दबाव आणला जात असून तसे न झाल्यास सरवणकर यांच्याऐवजी अमित ठाकरे यांचा प्रचार करण्याबाबतची भूमिका भाजपकडून घेतली जाणार असल्याचे समजते.
माहीमची लढत तिरंगीच
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात मंगळवारी शेवटच्या काही तासांमध्ये अनेक बंडखोरांबरोबरच मोठ्या प्रमाणात अपक्षांनीही अर्ज दाखल केले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या दादर माहीम मतदारसंघात शिवसेनेनेचे सदा सरवणकर मनसेच्या अमित ठाकरे यांच्याविरोधात अर्ज दाखल करणार की नाही, याविषयी बरीच उत्सुकता होती.
Amit Thackeray Net worth : वडील राज ठाकरेंनाच ८४ लाखांचं कर्ज, दादरच्या स्टेट बँकेत १०७ खाती, अमित ठाकरेंची संपत्ती किती?
सरवणकर यांच्यावर दबाव असून ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना माघार घ्यायला लावतील, अशी अटकळ लावली जात होती. सरवणकर यांनी माघार घ्यावी आणि महायुती म्हणून अमित ठाकरे यांना मदत व्हावी यासाठी भाजपच्या राज्यातील काही नेत्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. मात्र तसे काहीही घडलेले नसून सरवणकर यांनी अर्ज दाखल केला.
मुख्यमंत्र्यांनी मागे हटण्यास सांगितलं नाही
विशेष म्हणजे सरवणकर यांनी कोणताही गाजावाजा न करता काही मोजक्या कार्यकत्यांच्यासोबत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. ‘निवडणुकीतून माघार घेण्यासाठी माझ्यावर दबाव आहे. मात्र मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मी उमेदवारी अर्ज भरणार आहे, असे सदा सरवणकरांनी यांनी सोमवारीच सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी एबी फॉर्म दिला असून त्यांनी माघार घेण्यासंदर्भात मला काही सांगितलेले नाही. राज ठाकरे पुत्रप्रेमासाठी हे सर्व करत आहेत, असे सदा सरवणकर म्हणाले होते.
Trupti Sawant : मातोश्रीच्या अंगणात मनसेचा ट्विस्ट, नारायण राणेंना पाडणाऱ्या माजी आमदाराला तिकीट जाहीर
माघारीसाठी प्रयत्न
सरवणकर यांच्यामुळे आता राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार का, तसेच त्यांच्या उमेदवारांना महायुतीकडून मदत होणार या याविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत असून या जागेवरचा गुंता तोपर्यंत सुरूच राहणार असल्याचे बोलले जात आहे.
Amit Thackeray : माहीममध्ये अमित ठाकरेंचं वजन वाढलं? भाजप मनसेचा प्रचार करण्याचे संकेत, सरवणकरांची कोंडी
दुसरीकडे सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपकडून शिवसेनेवर दबाव असल्याचे कळते. राज्यतील भाजपच्या एका मोठ्या नेत्याने अमित ठाकरे यांना उभे करण्याबाबत तसेच त्यांची निवडणूक सोपी करून देण्याबाबत राज ठाकरे यांना शब्द दिला होता असे समजते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या उमेदवाराला माघार घ्यायला न लावल्यास या ठिकाणी भाजपकडून शिंदे यांच्या उमेदवाराऐवजी अमित ठाकरे यांचा प्रचार करण्याबाबत ठरवले जाणार असल्याचेही समजते.