Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर आर रा… आबांच्या लेकाला पाडण्यासाठी ‘खतरनाक’ प्लान; तासगावात ‘रायगड पॅटर्न’

10

Rohit Patil: विधानसभा निवडणुकीत तासगावामध्ये वैशिष्ट्यपूर्ण लढत होत आहे. संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील असा सामना तासगावात आहे. आर आर पाटील यांचे पुत्र पहिल्यांदाच विधानसभा लढवत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सांगली: जिल्ह्यातील तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघात दोन राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आहेत. शरद पवारांचे उमेदवार रोहित पाटील यांना पाडण्यासाठी अजित पवारांनी फिल्डींग लावली आहे. त्यासाठी त्यांनी भाजपचे दोन टर्मचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना पक्षात घेत तिकीट दिलं आहे. रोहित पाटील यांच्या पराभवासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारसंघात पूर्ण ताकद लावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तासगावच्या आमदार सुमन पाटील यांनी शरद पवारांच्या गटात राहण्याचा निर्णय घेतला. त्या माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी आहेत. यंदा सुमन पाटील यांचे पुत्र रोहित पाटील निवडणूक लढवत आहेत. रोहित पाटील पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर माजी खासदारांचं आव्हान आहे. आर. आर. पाटील आणि संजय काका पाटील यांच्यातला संघर्ष जिल्ह्याला नवा नाही.
Maharashtra Election 2024: मंत्रालयात फडणवीसांची नेमप्लेट तोडणाऱ्या महिलेचा उमेदवारी अर्ज; त्यात भाजपचा उल्लेख, पण…
तासगाव कवठे महाकाळमध्ये एकूण ३३ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे त्यात ४ जण रोहित पाटील आहे. यातील एक रोहित पाटील शरद पवारांचे उमेदवार आहेत. तर अन्य तीन रोहित पाटील यांच्यापैकी दोघांच्या नावांचा इंग्रजी आद्याक्षरानुसार उच्चार आर. आर. पाटील असाच होतो. या नामसाधर्म्यामुळे शरद पवारांचे शिलेदार असलेल्या रोहित पाटील यांची गोची होण्याची शक्यता आहे. हे तिघेही रोहित पाटील अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.
नांदगावात सुहास कांदे वि. सुहास कांदे, शिंदेंच्या आमदाराचे वांदे; भुजबळांचा डाव, सेनेसमोर पेच
तासगावात ‘रायगड पॅटर्न’
नामसाधर्म्य असलेला उमेदवार देऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराला अडचणीत आणण्याची खेळी राजकारणात अनेकदा केली जाते. २०१४ मध्ये याच खेळीनं लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता. अटीतटीच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्याकडून पराभूत झाले होते.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तटकरे यांना ३ लाख ९४ हजार ०६८ मतं मिळाली होती. तर सेनेच्या गीते यांना ३ लाख ९६ हजार १७८ मतं पडली होती. तटकरे अवघ्या २ हजार ११० मतांनी पराभूत झाले. त्यावेळी अपक्ष लढलेल्या सुनील तटकरे नावाच्या उमेदवाराला ९ हजार ८४९ मतं मिळाली होती. याच मतांमुळे तटकरेंचा पराभव झाला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.