Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Palghar Explosion: मध्यरात्रीच्या सुमारास भीषण स्फोट, भिंती कोसळल्या, चौघे जखमी, बोईसरमध्ये नागरिकांत घबराट
Boisar Unknown Object Blast: बोईसर येथे एका घरात भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार जण जखणी झाल्याची माहिती आहे. तर घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
एका खोलीत भीषण स्फोट, चार जखमी
पालघर तालुक्यातील बोईसर परिसरातील अवधनगर येथे असलेल्या दुबे चाळीतील एका खोलीत हा भीषण स्फोट झाल्याची घटना घडल्याची माहिती आहे. अचानक स्फोट झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि परिसरात सर्वत्र घबराट पसरली. बुधवारी रात्री साडे अकरा-पावणेबारा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. या स्फोटात दोन मुले, एक पुरुष, एक महिला असे एकूण चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.
Devendra Fadnavis: भाजपचा मुख्यमंत्री होणार; फडणवीसांनी मित्राचं वक्तव्य खोडलं, म्हणाले – राज ठाकरेंचे आभार पण…
जखमींना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, या स्फोटामुळे चाळीतील खोलींच्या भिंती कोसळल्या आहेत. तसेच, आजूबाजूच्या घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनास्थळाची पाहणी केली. तसेच, श्वान पथकाला देखील सदर ठिकाणी पाचारण करून त्यामार्फत देखील तपास करण्यात आला आहे. त्याशिवाय, फॉरेन्सिक टीम मार्फत देखील घटनेता तपास करण्यात येत आहे.
Palghar Explosion: मध्यरात्रीच्या सुमारास भीषण स्फोट, भिंती कोसळल्या, चौघे जखमी, बोईसरमध्ये नागरिकांत घबराट
सिलेंडर फुटल्याने हा भीषण स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, चाळीतील एका खोलीतील कपाटातील संशयास्पद वस्तू किंवा फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे. तरी, या भीषण स्फोटाचे खरं कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांमार्फत सुरू आहे. तरी, नागरिकांमध्ये या घटनेने घबराट पसरली आहे.