Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Election 2024: मंत्रालयात शिरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नामफलकाची मोडतोड करणाऱ्या महिलेनं विधानसभेसाठी अर्ज दाखल केला. त्यावर भाजपचा उल्लेख आहे.
मंत्रालयाची सुरक्षा भेदून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दालन गाठून तिथे असलेल्या नामफलकाची तोडफोड केल्यानं धनश्री सहस्रबुद्धे चर्चेत आल्या. त्यावेळी तिथे महिला पोलीस नसल्यानं सहस्रबुद्धे यांना पकडण्यात आलं नाही. आता सहस्रबुद्धे यांनी थेट भाजपकडूनच उमेदवारी अर्ज भरला. पण त्यासोबत पक्षाचा एबी फॉर्म नसल्यानं त्यांचा अर्ज बाद ठरण्यात आला. ‘मिड डे’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
Raj Thackeray: ‘त्या’ २ जागा शिंदेंच्या हट्टानं गेल्या, मी निशाणी ढापलेली नाही; राज ठाकरेंचा सणसणीत टोला
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरे इथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. माहीममध्ये महायुतीकडून शिंदेसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात अपक्षांची संख्याही मोठी आहे. सहस्रबुद्धे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जातील पक्षाच्या रकान्यात भाजपचा उल्लेख केला होता. बुधवारी त्यांच्या अर्जाची छाननी झाली. सहस्रबुद्धे यांनी उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्यानं त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच एबी फॉर्म दिला जातो. अर्जात पक्षाचा उल्लेख असेल, पण त्या पक्षाचा एबी फॉर्म सोबत नसेल तर तो अर्ज बाद ठरतो, असा नियम आहे.
Nawab Malik: मलिकांना तिकीट, नाराज फडणवीसांचा ‘बुलेट पाटलां’ना सपोर्ट; अजितदादांची गुगली, सस्पेन्स वाढला
सहस्रबुद्धे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सहस्रबुद्धे आणि भाजपचा कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं. फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरील नामफलक तोडल्यानं पोलिसांनी सहस्रबुद्धे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. सहस्रबुद्धे यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं पोलीस तपासातून समोर आलं. त्या दादरच्या रहिवासी आहेत. थेट फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयापर्यंत पोहोचून सहस्रबुद्धे यांनी पोलिसांच्या उपस्थितीत नामफलकाची मोडतोड केल्यानं मंत्रालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.