Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बहुजन विकास आघाडी पुन्हा अडचणीत, शिट्टी निशाणी न मिळण्याची शक्यता; उच्च न्यायालयात धाव

7

Bahujan Vikas Aghadi Hitendra Thakur: बहुजन विकास आघाडीची शिट्टी ही निशाणी इतर पक्षाला देण्यात आल्याने पक्षाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार हितेंद्र ठाकूर म्हणाले की, ज्यांना हरण्याची भीती असते ते चिन्ह चोरतात.

Lipi

नमित पाटील, पालघर: बहुजन विकास आघाडीचे शिट्टी निशाणी इतर पक्षाला देण्यात आल्याने बहुजन विकास आघाडी पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीची सर्वश्रूत निशाणी शिट्टी पुन्हा एकदा पळवण्यात आली असून आम्ही या सर्व अडचणीवर आम्ही मात सर्व अडचणींवर मात करून विजयी होऊ असा विश्वास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी ही निशाणी जनता दल- युनायटेड या पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिले आहेत. बहुजन विकास आघाडीसह इतर नोंदणीकृत राजकीय पक्ष तसेच अपक्षांना शिट्टी या निशाणीचा वापर करता येणे यामुळे अवघड झाले आहे.

पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीची शिट्टी ही निशाणी सर्वांनाच परिचित आहे. मात्र शिट्टी निशाणी मिळेल की नाही याबाबत साशंकता असून बहुजन विकास आघाडी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. या विरोधात बहुजन विकास आघाडी पक्षाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून शिट्टी निशाणी मिळावी यासाठी दाद मागितली आहे.
Anantrao Deshmukh: आसमन से टपके… जे कांग्रेसमध्ये घडलं, तेच भाजपने केलं; अनंतराव देशमुख पुन्हा अपक्ष निवडणूक लढणार?
माझे कार्यकर्ते आणि सोशल मीडिया, मिडिया यांच्या माध्यमातून कोणतीही नवीन निशाणी एक दिवसात घराघरात पोहचवतील असा विश्वास व्यक्त केला. शिट्टी हे चिन्ह पळवल्या बद्दल जितेंद्र ठाकूर यांनी यावेळी रोष व्यक्त करत, एवढ्या खालच्या दर्जाच राजकारण कुणी करु नये, ज्यांना हरण्याची भिती आहे, तेच लोक असे उपक्रम करतात, चलता है… लोक बोलत नसतात, पण लोक बघतात, ते सुज्ञ आहेत. लोकांना सर्व माहिती आहे. आमचा पहिला होता चष्मा तो चष्मा त्यांनी पळवला, त्यानंतर शिट्टी पळवली, मग रिक्षा घेतली, आता पुन्हा शिट्टी पळवली.

सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे, हे सर्व राजकारण मुद्दामून केले जात आहे. ज्या पक्षाचा महाराष्ट्रात एकही उमेदवार नाही अशा राजकीय पक्षाला शिट्टी निशाणी देण्यात आली आहे. लोकसभेत आम्हाला शिट्टी निशाणी देण्यात आली होती, मात्र आता विधानसभेला पुन्हा त्यांना प्रॉब्लम आला आहे. चिन्हा संबंधी जे नियम आहेत त्यात तरतूद आहे. की, आगोदरचा जो उमेदवार ज्या निशाणी वर जिंकला असेल, ती निशाणी घेण्याचा पहिला अधिकार त्या उमेदवाराला मिळतो. सध्या दबावाखाली हा निशाणी दिली जात नाही. उलट शिट्टी गोठवली तर नागरीक भडकतील, हे चोरा चोरीचे धंदे, पळवा पळवीचे धंदे सुरू करण्यात आले आहेत. मागील वेळी चिन्ह पळवा पळवीचा लोकांना थोडा फार विसर पडला होता. मात्र आता परत त्यांच्या आठवणी ताज्या होतील आणि आमचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील, असे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.

Vidhan Sabha Nivadnuk: बहुजन विकास आघाडी पुन्हा अडचणीत, शिट्टी निशाणी न मिळण्याची शक्यता; उच्च न्यायालयात धाव

बहुजन विकास आघाडीने पालघर जिल्ह्यात सहापैकी सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार अर्ज दाखल करत आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र डहाणूचे महाविकास आघाडी माकपचे उमेदवार विनोद निकोले आणि विक्रमगडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुनिल भुसार हे आपल्याला भेटण्यासाठी आले होते. बविआने त्या ठिकाणी उभे केलेले उमेदवार मागे घेण्यासाठी मनधरणी व विनंती ते करीत आहेत. माञ लोकसभेत आम्ही आमच्या हिशोबात लढतो, आता विधानसभेत ही आम्ही ठरवू असे देखील हितेंद्र ठाकूर सांगितले.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.