Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

धूर अन् धडाम…. फटाक्यांमुळे दुचाकींची जोरदार धडक, चौघे उडाले, मग… पुण्यातील थरारक VIDEO

7

Pune Bike Collide With Each Other: पुण्यात फटाक्यांच्या धुरामुळे दोन बाईकची टक्कर झाली आणि बाईकवरील चौघे उडून बाजूला फेकले गेले. या घटनेचा धडकी भरवणारा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Lipi

आदित्य भवार, पुणे: दिवाळीचा सण आला की सर्वांनाच फटाक्यांची आठवण येते. त्यातच यावर्षी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेले. या फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढली झाली आहे. दरम्यान, फटाक्यांच्या धुरामुळे दोन दुचाकीस्वारांचा थरारक अपघात झाला आहे. ही घटना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोडवर शनिवार (२ नोव्हेंबरला) रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये अपघात झाल्याने एकजण गंभीर जखमी तर अन्य तिघांना गंभीर मार लागल्याची माहिती आहे.
Gopal Shetty : हे पाऊल उचलताना खूप वेदना झाल्या, गोपाळ शेट्टींची विधानसभेच्या रिंगणातून माघार
चक्रधर संतोष कांचन, क्षितिज राहुल जाधव (वय- १८, रा. दोघेही उरुळी कांचन), सिद्धांत नवनाथ सातव (वय- २) व प्रतिक संतोष साठे (वय- २०) असं अपघातात जखमी झालेल्या चौघांची नावं आहेत. यातील सिद्धांत सातव याच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चक्रधर कांचन आणि त्याचा मित्र क्षितिज जाधव हे दोघेजण बुलेट गाडीवर आश्रम रोडने निघाले होते. तर सिद्धांत सातव आणि प्रतिक साठे हे दोघेजण इलेक्ट्रिक गाडीवर भवरापूरवरून उरुळी कांचन येथे काही कामानिमित्त निघाले होते. यावेळी आश्रम रोडवर जुन्या ठिकाणी असलेल्या एचडीएफसी बँकेसमोर एका दुकानाचे उद्घाटन सुरू होते. यावेळी त्या ठिकाणी काही नागरिक रस्त्यावर फटाके वाजवत होते. त्यामुळे रस्ता पूर्णपणे हा धुरमय झाला होता. यावेळी अचानक पेटलेला फटाका दुचाकी चालकाला दिसला.

Pune News: धूर अन् धडाम…. फटाक्यांमुळे दुचाकींची जोरदार धडक, चौघे उडाले, मग… पुण्यातील थरारक VIDEO

दरम्यान, पेटवलेला फटाका वाचवताना आश्रम रोडने आलेल्या दुचाकीने सोलापूर हायवेकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील चौघेही उडून बाजूला पडले. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ सिद्धिविनायक रुग्णालयात नागरिकांच्या मदतीने दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.