Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सदा माझा लढवय्या शिवसैनिक, राजपुत्रासाठी शिवधनुष्य खाली नको, सरवणकरांसाठी सेनाभवनासमोर बॅनर

12

Mahim Vidhan Sabha : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली सदा सरवणकर यांच्यासाठी मजकूर लिहून बॅनर छापण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी सरवणकरांवर दबाव होता. त्यानंतर अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेत सरवणकरांनी अर्ज मागे घेण्याचे संकेत दिले. त्यानंतर दादर येथील शिवसेना भवनासमोर सदा सरवणकरांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली मजकूर लिहून बॅनर छापण्यात आले आहेत.

बॅनरवर काय लिहिलंय?

सदा माझा लढवय्या शिवसैनिक आहेस तू, हटू नकोस, मोडू नकोस, माझ्या शिवसेनेचा वाघ आहेस तू ! चार दशकं जनसेवेसाठी दिलेस, राजपुत्रासाठी माघार घेऊ नकोस तू ! दादर, प्रभादेवी, माहीम मधील जनता तुझ्यासोबत आहे, तू केलेली सेवा पाहत आहे. आता जे घडत आहे, तुझ्यावरचा दबाव, तुझ्याविरुद्ध ताकद, तेही पाहत आहे. फक्त तू घाबरू नकोस, शिवधनुष्य खाली ठेऊ नकोस !
– समस्त दादरकर
Omprakash Raje Nimbalkar : शिंदेंचा निकटवर्ती ईडीच्या ताब्यात घेत भाजपने शिवसेना फोडली, ओमराजेंचा आरोप, शिंदेंच्या गोटातला ठाकरेंचा मोहराही सांगितला

Sada Sarvankar : सदा माझा लढवय्या शिवसैनिक आहेस तू, राजपुत्रासाठी शिवधनुष्य खाली ठेवू नकोस, सरवणकरांसाठी सेनाभवनासमोर बॅनरबाजी

सदा सरवणकर काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. दादरमधून धनुष्य बाण आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विधानसभेत जाणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी आमची इच्छा आहे. ही निवडणूक माझ्यासाठी वैयक्तिक नाही. शिवसैनिक अहोरात्र मेहनत घेत आहेत. मनसेने आमच्याविरुद्ध असलेले इतर सर्व उमेदवार मागे घ्यावेत, ही मी टाकलेली अट जर मान्य होत असेल, तर कार्यकर्त्यांशी बोलून मी अंतिम निर्णय कळवेन, असं सदा सरवणकर पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
Sushma Andhare : एका दगडात तीन पक्षी! वंचितचा उमेदवार, अंधारेंची शिष्टाई, ठाकरेंचं टेन्शन मिटलं, फडणवीसांना डोकेदुखी
एका सीटमुळे वातावरण खराब होऊ नये, असं मला वाटतं. एकनाथ शिंदे यांनी मला एकदाही उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितलेलं नाही. राज साहेबांविषयी आमच्या मनात प्रेम आहे. महायुतीचे आमदार वाढावेत, हीच आमची इच्छा आहे. हा त्याग एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत न्यायला कामी येईल. मोठे निर्णय घेताना एखादा बळी जातो, असं सदा सरवणकर म्हणाले होते.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.