Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Raju Parve: मार्चमध्ये काँग्रेस सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या राजू पारवेंनी पुन्हा पक्षांतर केलं आहे. आता त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
२०१४ मध्ये राजू पारवेंनी उमरेड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली. पण त्यांचा तब्बल ६८ हजार मतांनी पराभव झाला. यानंतर २०१५ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षानं २०१९ मध्ये त्यांना तिकीट दिलं. त्यांनी विधानसभा लढवली. भाजपचे आमदार सुधीर पारवेंचा त्यांनी पराभव केला. ते जवळपास १८ हजार मतांनी विजयी झाले.
पुन्हा सांगली पॅटर्न! आता काँग्रेसच्याच उमेदवाराविरोधात फिल्डींग; विशाल पाटील गेम करणार?
पहिल्यांदाच आमदार झालेले राजू पारवे २०२४ मध्ये काँग्रेसकडून रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. पण पक्षानं त्यांना तिकीट नाकारलं. त्यामुळे त्यांनी पक्षांतर केलं. ते शिंदेसेनेत गेले. विशेष म्हणजे रामटेकचे तत्कालीन खासदार कृपाल तुमाने यांनी शिंदेंना बंडात साथ दिली होती. पण शिंदेंनी त्याच तुमानेंचं तिकीट कापून राजू पारवेंना संधी दिली. पण काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंनी पारवेंचा तब्बल ७६ हजार ७६८ मतांनी धुव्वा उडवला.
शिंदेसेनेकडून खासदारकी लढवण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या राजू पारवेंनी लोकसभेतील पराभवानंतर पुन्हा एकदा आमदारकीसाठी प्रयत्न सुरु केले. ते पुन्हा उमरेडमधून लढण्यास उत्सुक होते. पण महायुतीत उमरेडची जागा भाजपला सुटली. त्यानंतर पारवेंनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष अर्ज भरला. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर त्यांनी अर्ज मागे घेतला.
Ajit Pawar: आधीच जागा कमी, त्यात काकांचं टेन्शन, आता मित्रपक्षांमुळे अडचण; अजितदादांच्या समस्या संपेनात
खासदारकीसाठी आमदारकी सोडणाऱ्या आणि आता आमदारकीचं तिकिटही न मिळालेल्या पारवेंनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जात भाजपमध्ये प्रवेश केला. पारवेंच्या भवितव्यासाठी आमच्याकडे नियोजन असल्याचं फडणवीस यांनी कालच म्हटलं होतं. त्यामुळे पारवेंना काय मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. पारवेंच्या प्रवेशाचा फायदा भाजपला उमरेड आणि नागपूर ग्रामीणमध्ये होऊ शकतो.