Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुन्हा सांगली पॅटर्न! आता काँग्रेसच्याच उमेदवाराविरोधात फिल्डींग; विशाल पाटील गेम करणार?

12

Sangli Politics: सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात काँग्रेसनं पृथ्वीराज पाटील यांना तिकीट दिलं आहे. त्यानंतर जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. त्यांनी माघार घेतली नसल्यानं मतदारसंघात तिरंगी लढत होईल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सांगली: लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्न गाजला. महाविकास आघाडीतील ठाकरेसेनेनं उमेदवार दिलेला असतानाही काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. ते निवडूनही आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. आता तशाच घटनांची पुनरावृत्ती सांगलीत सुरु झाली. विशेष म्हणजे या बंडखोरीमागेही विशाल पाटील यांचा पाठिंबा आहे. विशेष म्हणजे यंदा सांगली पॅटर्न काँग्रेसच्याच अधिकृत उमेदवाराविरोधातच वापरला जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात काँग्रेसनं पृथ्वीराज पाटील यांना तिकीट दिलं आहे. त्यानंतर जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. त्यांनी माघार घेतली नसल्यानं मतदारसंघात तिरंगी लढत होईल. अपक्ष निवडणूक लढून विजयी झालेल्या विशाल पाटलांनी जयश्री पाटील यांना पाठिंबा दिला आहे. जयश्री पाटील याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचं विशाल पाटील यांना जाहीर केलं आहे. विधानसभेतही सांगली पॅटर्न राबवणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
तुम्ही मला न्याय देणार होतात ना? शाहू महाराजांना एक फोन अन् मधुरिमांचा अर्ज मागे; काय घडलं?
वसंतदादा पाटील यांच्या घराण्यावर काँग्रेस सातत्यानं अन्याय का करतंय, असा सवाल विशाल पाटील यांनी विचारला. सांगलीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव काँग्रेसचा उमेदवार करु शकत नाही. त्यामुळे अपक्ष लढणाऱ्या जयश्री पाटील यांना निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं. जयश्री पाटील यांच्या प्रचाराला शुभारंभ होत असताना खासदार विशाल पाटील हजर होते.

जयश्री पाटील यांची उमेदवारी महाविकास आघाडीचीच उमेदवारी असल्याचं मी जाहीर करतो. कारण मी खासदार म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीला काँग्रेसचे ९९ उमेदवार निवडून आले. मी शंभरावा खासदार आहे. तशाच प्रकारे जयश्री पाटील शंभराव्या आमदार असतील, असं विशाल पाटील म्हणाले.Raj Thackeray: भाजपला बाय न् शिंदेंची कोंडी; राज ठाकरेंनी फिल्डींग लावली; किती जागांवर छुप्या युतीची चर्चा?
यावेळी विशाल पाटील यांनी एका वेगळ्याच पॅटर्नवर भाष्य केलं. ‘सांगली जिल्ह्यात २०१४ पासून एक पॅटर्न दिसून येतोय. गेल्या १० वर्षांत वसंतदादांच्या कुटुंबात एकही उमेदवारी देण्यात आलेली नाही. लोकसभेत आणि विधानसभेत फसवणूक झाली. आमच्या कुटुंबाचं नेमकं काय चुकलंय, ते कळत नाही. आमच्या कुटुंबाची निष्ठा कुठे कमी पडली का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.