Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll 2024 Result Date Time: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. या एक्झिट पोलवरून महाराष्ट्रात महायुतीचे सरकार कायम राहणार की महाविकास आघाडी सत्तापालट करण्यात यशस्वी होईल याची कल्पना येईल. तुम्ही हा एक्झिट पोल कधी, कुठे आणि कसा पाहू शकता ते येथे जाणून घ्या.
कधी आणि किती वाजता येणार एक्झिट पोल?
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मतदान संपल्यानंतरच एक्झिट पोल जाहीर केले जाऊ शकतात. मतदार मतदान करण्यापूर्वी एक्झिट पोलच्या अंदाजाने प्रभावित होणार नाही म्हणून मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर केले जातात. अशा स्थितीत, संध्याकाळी ६ वाजता मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल जाहीर होतील पण लक्षात ठेवा की एक्झिट पोलमध्ये विजय-पराजय आणि जागांचा अंदाज केवळ मतदान केंद्रावरील मतदारांशी संभाषणातून केला जातो आणि अधिकृत निकाल नसतो. एक्झिट पोल निवडणुकीत कोणत्या पक्षाची कामगिरी कशी आहे याचे प्राथमिक संकेत देतात मात्र, या वेळी २३ नोव्हेंबर रोजी होणारी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निकाल स्पष्ट होतील.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्यामुळे कारस्थान रचलं गेलं? विनोद तावडेंनी सांगितली ‘अंदर की बात’
महाराष्ट्र एक्झिट पोलचे निकाल कुठे पहावेत
२० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर सर्व वृत्तवाहिन्या एक्झिट पोल दाखवण्यास सुरुवात करतील. NDTV, इंडिया टुडे, टाइम्स नाऊ आणि रिपब्लिक टीव्ही यासारख्या प्रमुख राष्ट्रीय वृत्तवाहिन्या त्यांचे स्वतंत्र एक्झिट पोल निकाल जाहीर करतील. याशिवाय, Axis My India, C Voter, Matrice आणि People’s Pulse सारख्या प्रमुख मतदान संस्थाही अंदाज जनतेसमोर ठेवतील. तसेच या सर्व एक्झिट पोलचे तपशीलवार विश्लेषण तुम्ही आमची अधिकृत वेबसाइट https://marathi.indiatimes.com/ वर थेट पाहू शकता.
महाराष्ट्रात आज महापरीक्षा! नऊ कोटी ७७ लाख मतदारांचे फेव्हरेट कोण? ४१३४ उमेदवार रिंगणात
https://marathi.indiatimes.com/ तुम्हाला महाराष्ट्र एक्झिट पोलच्या निकालांबद्दल लाइव्ह अपडेट देत राहील. अशा परिस्थितीत, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य निकालांवरील तपशीलवार विश्लेषण आणि तज्ञांच्या टिप्पण्या तसेच जागांचे अंदाज आणि राजकीय ट्रेंडवरील अपडेट्ससाठी आमची न्यूज साइट पाहत राहा.