Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवले तर विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला मिळून फक्त ५० जागा जिंकता आल्या. मविआमधील एकाही पक्षाकडे विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यासाठी लागणारे संख्याबळ नसल्याने यावेळी विधानसभेत विरोधपक्ष नेतेपद असणार नाही. पाहा यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट काय म्हणाले.
राज्यातील नव्या विधानसभेत सत्ताधारी २२५ तर उर्वरित विरोधात असे चित्र असले तरी विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यासाठी अवश्यक असेलले संख्याबळ कोणालाच मिळालेले नाही. यामुळे यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपद असणार नाही. याआधी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने लोकसभेत विरोधीपक्ष नेताच नव्हता. आता तशी स्थिती महाराष्ट्रात आली आहे. यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य केले आहे.
तुमच्या मतदारसंघात कोण विजयी झाले? महाराष्ट्रातील २८८ नवनिर्वाचित आमदारांची यादी एका क्लिकवर
आपल्याकडे संसदीय लोकशाही पद्धत आहे. ज्यात सत्ताधारी पक्ष सोबत विरोधी पक्ष असतो आणि त्याला नेता देखील असतो. आपल्याकडे विविध पक्ष असल्याने छोटे छोटे पक्ष असतात आणि ते एकदशांश पर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे त्यांना विरोधीपक्ष नेतेपद मिळत नाही. हे याआधी २०१४च्या निवडणुकीत राहुल गांधींसोबत झाले होते. यावेळी मात्र काँग्रेसला १०० जागा मिळाल्याने त्यांना ते पद मिळाले. आता महाराष्ट्रात प्रथमच होत आहे. यावेळीचा निकाल खुप वैशिष्टपूर्ण लागला आहे. तो अपेक्षित नव्हता. जे राजकीय पक्ष मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवत होते. त्यांना आता विरोधीपक्षपद देखील मिळत नाही. इतके उलटे पालटे निकाल लागले आहेत.
विराटचे पर्थमधील शतक साधेसुधे नाही! भारताच्या किंगने सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकला
महाराष्ट्रात विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यासाठी २८८ पैकी २९ जागा लागतात. ज्या कोणत्याच पक्षाकडे नाहीत. विरोधीपक्ष नेता हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे इथे १० टक्के जागा नसल्या तरी विरोधीपक्ष नेतेपद देणे हे विधानसभा आणि अध्यक्ष यांच्या हातात आहे. पण हे सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या हातात आहे की हा उदारपणा ते दाखवतात का? तसे त्यांनी जर केले तर मोठ मन दाखवल्या सारखे होईल.
विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य असलेले एकमेव आमदार! चौरंगी लढतीत मिळवला विजय; जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खाते खुलले
विरोधीपक्ष नेतापद नसले तर काय होईल?
विरोधीपक्ष नेत्याला खुप अधिकार असतात.एखाद्या मंत्र्या प्रमाणे त्याला अधिकार असतात. जर सभागृहात तो नसेल तर विरोधकांची कार्यक्षमता कमी होते. अनेक कायदे करताना विविध समित्या असतात. त्यामध्ये विरोधीपक्ष नेता महत्त्वाचा असतो. त्यामुळे जो लोकशाहीचा आत्मा आहे त्यापासून आपण दूर जात आहोत.
दोन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला. तसेच त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली तर विरोधीपक्ष नेतेपद मिळू शकते, असे ही उल्हास बापट यांनी सांगितले.