Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लॉबिंग सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडक आमदारांना मुंबईतच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवसेनेच्या सात आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. तर तीन माजी मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि वाचाळवीर मंत्र्यांना नारळ मिळण्याचे संकेत मिळत आहे. त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हं व्यक्त केली जात आहेत.
ज्येष्ठ मंत्र्यांना मुंबईतच थांबण्यास सांगण्यात आलं आहे. तर तिघांचा पत्ता कट होण्याचे संकेत मिळत आहेत, मात्र नाराजी टाळण्यासाठी यासंबंधी गुप्तता बाळगली जात आहे. तर तीन नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसू शकतात. यामध्ये मराठा आंदोलनात वाटाघाटी करणाऱ्या अर्जुन खोतकर यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. कोल्हापुरातून प्रकाश आबिटकर, तर छत्रपती संभाजीनगर येथून अन्य एका आमदाराची मंत्रिपदी वर्णी लागू शकते.
Maharashtra CM : सहा दिवसांनी समोरासमोर, ‘वर्षा’ निवासस्थानी अर्धा तास चर्चा, शिंदे-फडणवीसांमध्ये बंद दाराआड काय ठरलं?
चाचण्या करुन शिंदे कामाला लागले
दरम्यान, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दुपारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारार्थ गेले होते. तेथे शिंदे यांच्या आवश्यक चाचण्या केल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी रुग्णालयातून बाहेर येताच शिंदे यांनी, तपासणीसाठी आलो होतो, प्रकृती उत्तम आहे, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Shiv Sena : मुंबईतच थांबा, शिवेसेनच्या सात आमदारांना शिंदेंच्या सूचना, तीन मंत्र्यांचे पत्ते कट
एकनाथ शिंदे रविवारी सातार्यातील दरे गावाहून ठाण्यातील निवासस्थानी आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी घरी विश्रांती घेतली. त्यामुळे सोमवारच्या नियोजित सर्व बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. अखेर मंगळवारी शिंदे यांनी थेट ज्युपिटर रुग्णालय गाठले. यावेळी त्यांच्यासमवेत पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.
Balya Mama Mhatre : माझ्याच गाडीने भरदुपारी गेलो म्हणजे… बाळ्यामामांनी फडणवीसांसोबत भेटीचं गुपित उलगडलंच
तब्बल तासभर रुग्णालयात शिंदे यांच्या आवश्यक चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्यांची तपासणीही केली. त्यानंतर ते रुग्णालयाबाहेर आले. शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यांचे प्रकृतीविषयक सर्व अहवाल उत्तम असल्याचे ज्युपिटर रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.