Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Solar Eclipse 2025 : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यंदा नवीन वर्षात २ सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असणार आहे. नवीन वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे २९ मार्च २०२५ ला असणार आहे. २०२५ च्या नवीन वर्षात सूर्यग्रहण कितीवेळा आणि कधी असणार आहे, त्याचा परिणाम कसा होईल जाणून घेऊया.
Solar Eclipse 2025 :
नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यंदा नवीन वर्षात २ सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असणार आहे. नवीन वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे २९ मार्च २०२५ ला असणार आहे.
ज्योतिशास्त्रानुसार या दिवशी शनि कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. ज्या दिवशी सूर्यग्रहण असेल त्यादिवशी शनि संक्रमण होईल. त्यामुळे अनेक राशींवर त्याचा चांगला वाईट परिणाम पाहायला मिळेल. २०२५ च्या नवीन वर्षात सूर्यग्रहण कितीवेळा आणि कधी असणार आहे, त्याचा परिणाम कसा होईल जाणून घेऊया.
सूर्यग्रहण कधी तयार होते?
ज्यावेळी आकाशात चंद्र सूर्य आणि पृथ्वीचा संयोग होतो, तेव्हा सूर्यग्रहण होते. यामुळे चंद्र पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश रोखतो. याला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत. पहिले पूर्ण सूर्यग्रहण, दुसरे आंशिक सूर्यग्रहण आणि तिसरे कंकणाकृती सूर्यग्रहण.
२०२५ मधील पहिले सूर्यग्रहण
२९ मार्च २०२५ ला वर्षातले पहिले सूर्यग्रहण होणार आहे. या दिवशी शनिचे मीन राशीत संक्रमण होईल. हे ग्रहण फाल्गुन महिन्यातील अमावस्येला असणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे दुपारी २ वाजून २१ मिनिटांनी सुरु होऊन संध्याकाळी ६ वाजून १६ मिनिटांपर्यंत असेल. ग्रहण काळ हा ३ तास ५३ मिनिटांचा असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. युरोप, उत्तर आशिया, उत्तर-पश्चिम आफ्रिका, आंशिक उत्तर अमेरिका, अटलांटिक महासागर, उत्तर ध्रुव या ठिकाणी ग्रहण काळ पाळण्यात येईल.
२०२५ मधील दुसरे सूर्यग्रहण
वर्षातले दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण हे २१ सप्टेंबरला रविवारी असणार आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला आंशिक सूर्यग्रहण असेल. हे सूर्यग्रहण रात्री ११ वाजून २४ मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत असेल. हा ग्रहण कालावधी ४ तास २४ मिनिटे असेल. हे सूर्यग्रहण अमेरिका, सामोआ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, अटलांटिक महासागर या ठिकाणी असणार आहे.