Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल नगरपालिकेतर्फे आयोजित पर्यावरणपूरक इ-बाईक प्रदर्शनास उत्कृष्ट प्रतीसाद..!

12

(शैलेश चौधरी)

एरंडोल:येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरपालिकेतर्फे इलेक्ट्रीक व्हेईकल प्रदर्शन भरविण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी व तहसिलदार सुचेता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे होते.

पाहूण्यांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन हितेश जोगी यांनी केले.

गुजरातमधील ‘वर्ल्ड विझार्ड,या कंपनीतर्फे भरविण्यात आलेल्या जॉय-इ-बाईक प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या.
यावेळी समाजसेवक आनंद दाभाडे,राजेंद्र शिंदे,विजय भामरे,स.पो.नि तुषार देवरे,न.पा चे कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी,प्रियंका जैन,डॉ. अजीत भट, योगेश सुकटे,देवेंद्र शिंदे,विकास पंचबुद्धे,दिपक गोसावी,जहीरोद्दीन शेख आदी उपस्थित होते.

यावेळी प्रदर्शनास भेट देणार्या नागरीकांना रोपांची भेट देण्यात आली.
एका नागरीकाने प्रदर्शनाच्या ठिकाणीच तात्काळ पर्यावरणपुरक दुचाकी खरेदी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.