Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी अनंत अंबानींचे वनतारा मागील प्रयत्नांना दिली दाद

50

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी अनंत अंबानी यांच्या वनतारा प्राणी बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राचे कौतुक केलं. शास्त्रीजी म्हणाले की सर्व सजीवांमध्ये देव असतो आणि वनतारा या उद्देशाला साजेशी कामगिरी करत आहे. नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या या प्रकल्पाने 1.5 लाखाहून अधिक प्राण्यांना आश्रय दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नुकतेच जगातील सर्वात मोठ्या प्राणी बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असलेल्या वनतारा बाबत आपले विचार व्यक्त केले. ज्या उल्लेखनीय पातळीवर प्राण्यांचे जीव वाचवले जात आहेत, त्याचे त्यांनी कौतुक केलं. या उपक्रमामागील दृष्टिकोनाचे कौतुक करत त्यांनी “जीव में ही शिव है” अर्थात सर्व सजीवांमध्ये देव असतो असं ते म्हणाले. हा विचार वनताराच्या वन्यजीव संवर्धनाच्या उद्देशाशी मिळता जुळता आहे.

https://www.instagram.com/p/DHAhh5HAsWE/https://www.instagram.com/p/DHAhh5HAsWE/

गुजरातमध्ये 3,500 एकर परिसरात पसरलेले वनतारा, जगभरातील प्राण्यांचा बचाव, उपचार आणि संवर्धन करण्यासाठी समर्पित असं अभूतपूर्व केंद्र आहे. 4 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकृतपणे उद्घाटन झालेले हे केंद्र अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या प्रमाणात वन्यजीव संवर्धनाचे काम करत आहे. इथे बचाव मोहिमांमधून आलेले दीड लाखांपेक्षा जास्त प्राणी आहेत. या केंद्रात प्रगत मल्टी-स्पेशालिटी वन्यजीव हॉस्पिटल, नवजात शिशु आयसीयू, वन्यजीवांसाठी विशेष अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि अत्याधुनिक नवजात शिशु काळजी केंद्राच्या माध्यमातून प्राण्यांची काळजी घेतली जाते.

वनतारा बाबत बोलताना त्यांनी नावाच्या अर्थावर विशेष भर दिला. “वनतारा,” म्हणजे “वनातील तारा,” असं ते म्हणाले. वाचवलेल्या प्राण्यांना आशा आणि नवीन जीवन देण्याच्या केंद्राचा उद्देश या नावातून स्पष्ट होतो, असं त्यांना वाटतं. नामशेष होत असलेल्या प्रजातींसह भारतातील आणि परदेशातील प्राण्यांना वनतारामध्ये कशाप्रकारे आश्रय मिळाला आहे, याविषयी देखील ते बोलले. या केंद्रात समस्यांचा सामना करत असलेल्या प्राण्यांना जगण्याची दुसरी संधी दिली जात आहे.

त्यांनी अनंत अंबानी यांच्या वन्यजीव संवर्धनाच्या दृढ आणि दयाळूपणाचे कौतुक केलं आणि त्यांच्या या उपक्रमात त्यांना यश मिळावं अशा शुभेच्छा दिल्या. वनताराची विशालता आणि त्यामागील विचार यामुळे हा प्राण्यांची काळजी आणि संवर्धनाचा एक अतुलनीय उपक्रम ठरतो, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो.आणखी वाचा



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.