Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Chhaava Box Office Report: छावा सिनेमा रिलीज होऊन २९ दिवसांचा कालावधी उलटला आहे तरीही त्या सिनेमाच्या कमाईचा वेग कमी झालेला नाही. आता या सिनेमाने मोठमोठ्या सिनेमांचा विक्रम मोडीत काढला आहे.
Priyanka Chopra ने बऱ्याच वर्षांनी भारतात साजरी केली होळी, पण कुटुंब नव्हतं सोबतीला, मग कोणासोबत खेळली धूळवड
‘छावा’ चित्रपटाने इतका गल्ला जमवला
विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही कमाल करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळजवळ एक महिना उलटला पण त्याची क्रेझ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. ‘सॅन्सिल्क’च्या अहवालानुसार, ‘छावा’ चित्रपटाने २९ व्या दिवशी ७.२५ कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत या सिनेमाने ५४६.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पण हे आकडे अंतिम नाहीत. होळीच्या दिवशी झालेल्या कमाईमुळे विकी कौशलचा हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप ३ चित्रपटांपैकी एक बनला आहे. विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट शाहरुख खानचा ‘पठाण’ (६४०.२५) आणि श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’ (५९७.९९) या चित्रपटानंतर तिसऱ्या स्थानी आहे.
Alia Bhatt Birthday: कितवी शिकलीय कपूर खानदानाची सून आलिया भट्ट? वाचा बॉलिवूडच्या सर्वात महागड्या अभिनेत्रीचे शिक्षण आणि संपत्ती
विकी कौशलच्या चित्रपटाटी कथा
‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी दाखवण्यात आली आहे. त्यांनी आपल्या युद्ध पराक्रमाने औरंगजेबाचा पराभव केला होता. शेवटी हतबल झालेल्या औरंगजेबाने तो काहीही करू शकला नाही, तेव्हा कपटाने संभाजी महाराजांना आपला कैदी बनवले आणि त्यांचा खूप छळ केला पण तरीही महाराज त्यांच्यापुढे झुकले नाही.
Chhaava Box Office Collection : विकी कौशलच्या ‘छावा’ला नंबर १ होण्यासाठी या दोन सिनेमांच चॅलेंज, धुलिवंदनालाही बॉक्स ऑफिसवर दबदबा
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि विनीत सिंग कुमार, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, संतोष जुवेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात विक्की कौशलने संभाजीची भूमिका साकारली होती तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली होती.