Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे – प्रतिनीध | विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र. क्र.१९०/२०२१ भा.द. वि कलम ३९२,४१३,३४ प्रमाणे दिनांक ०२/११/२०२१ रोजी गुन्हा दाखल केला असून दाखल गुन्ह्यातील फिर्यादी हबीबा अब्दुल शेख, वय ५१ वर्ष, धंदा – व्यवसाय रा. प्लॉट नं.९ , साई प्रसाद बिल्डिंग, विशाल परिसर, कळस, विश्रांतवाडी, पुणे ह्या त्यांचे घराचे समोर विशाल परिसर, कळस, येथे त्याचे समर्थ टपरीचे बाहेर बाजूस बाकावर बसले असता त्यांच्या टपरी चे समोर उभे असलेले दोन अनोळखी इसम हे त्यांच्या समोर काळ्या रंगाच्या दुचाकीवर येऊन दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचे गळ्यातील ३ तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारून तोडून जबरी चोरी करून कळस गावठाणाच्या दिशेने पळून गेले होते. यावेळी गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळाचे आजू बाजूचे फुटेज वरून एकूण १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून पोलीस शिपाई प्रफुल मोरे व पोलीस शिपाई शेखर खराडे, पोलीस शिपाई संदीप देवकाते यांनी सदर अज्ञात वाहनाचा व चैन चोराचा मार्ग काढला असता सदरचे अज्ञात आरोपी हे बारामती येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने पोहवा दीपक चव्हाण व पोलीस शिपाई संदीप देवकाते यांनी सदर ठिकाणी जावून त्यांनी त्याचे बातमीदार मार्फत सदर आरोपीची माहिती काढली असता सदरचे आरोपी हे २९ फाटा, बारामती येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी जावून सापळा रचून त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १)अशोक नामदेव गंगावणे वय ३१ वर्ष, रा. मु. बांदलवाडी तालुका बारामती, जिल्हा पुणे, २) अनिल रघुनाथ बिरदवडे वय ३२ वर्ष, सदर असे सांगितले त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना दाखल गुन्ह्यांत दि. १५/११/२०२१ रोजी अटक करण्यात आली असून त्यांनी अटक मुदतीत गुन्ह्यातील मुद्देमाल ३ तोळे वजनाची सोन्याची चैन ही इसम नामे आकाश महादेव सोनार राहणार बारामती, पुणे यास विक्री केल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला असून त्यास देि.२४/११/२०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई मा. नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मा. रोहिदास पवार, पोलीस उप- आयुक्त परिमंडळ ४ मा. रमेश गलांडे सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग मा. अजय चांदखेडे, वपोनि विश्रांतवाडी तसेच विजयकुमार शिंदे पोलीस निरीक्षक गुन्हे सपोनि संदिप यादव यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते व अंमलदार विजय सावंत ,दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, प्रफुल मोरे, शेखर खराडे, संदीप देवकाते, शिवाजी गोपनर, योगेश चांगल व विशेष पोलीस अधिकारी राज राठोड (पी -४ महाराष्ट्र राज्य) यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.