Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एस.एस.वायर चोरी प्रकरणी एरंडोल पोलिसांनी दिल्ली येथे जाऊन आवळल्या आरोपीच्या मुसक्या..!

10


(शैलेश चौधरी)

एरंडोल:येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगत च्या साईनाथ ढाब्यावर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम.एच.०५ डि. के.०५०६ या ट्रकमधुन २लाख ६९हजार नऊशे ८१ रूपये किंमतीच्या एस.एस.वायर चे ८बंडल लंपास केल्याप्रकरणी एरंडोल पोलिसांनी तपासाची चक्रे योग्य दिशेस फिरवुन राजकुमार शिवयग्य तीवारी वय-३७ या आरोपीस दिल्ली येथुन ताब्यात घेत व एरंडोल पोलिस स्टेशन ला सोमवारी मध्यराञी १:५४ वाजता आणुन अटक करण्यात आली.


दरम्यान,
मंगळवारी आरोपीस एरंडोल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता ३ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
उल्हासनगर येथील साईसेवा ट्रान्स्पोर्टचे मालक संदीप गंगा चौबे यांनी एरंडोल पोलीस स्टेशन ला फिर्याद देऊन ट्रकचालक राजकुमार तीवारी यानेच सदर चोरी केल्याचा संशय व्यक्त केला होता.
जिल्हा पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे,उपविभागीय अधिकारी राकेश जाधव व एरंडोल पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्स्टेबल विलास पाटील व पोलिस नाईक रवी वाघ यांनी आरोपीचा योग्य मागमुस घेत दिल्ली गाठली व त्या ठिकाणी आरोपी राजकुमार तीवारी याच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांच्या या कामगीरीचे सर्वञ स्वागत केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.