Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जन माहिती अधिकार्याकडून दिलेला खुलासा मान्य न झाल्याने एरंडोल नगरपालिकेस ३ हजारांची शास्ती…!

13

एरंडोल: येथील नगर पालिकेचे जन माहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक हितेश.आर.जोगी यांच्या विरोधात आबा संतोष महाजन यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहिती नुसार हितेश जोगी यांनी दिलेली माहिती आबा महाजन यांनी दिलेल्या माहिती अर्जाला अनुसरुन विहित मुदतीत तसेच अपिलाच्या निर्णयानंतर ही माहिती पुरविली नसल्याने त्यांचे विरुद्ध माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम २० (१) अन्वये शास्तीची कार्यवाही का करण्यात येऊ नये..? याचा खुलासा जोगी यांना सादर करण्याचे आदेश देऊन,खुलासा सादर न केल्यास त्यांचे काहीही म्हणणे नसल्याचे गृहीत धरून शास्तीचे नियम कायम केले जाऊ शकतील असे नमुद केले असल्याने तसेच त्यांनी दिलेला खुलासा हा अमान्य करुन त्यांच्या विरुद्ध माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम २० (१) अन्वये ३०००/- रु. शास्तीची कार्यवाही करण्यात आली आहे व सदरील रक्कम प्रथम अपिलीय अधिकारी तथा मुख्याधिकारी एरंडोल यांनी जोगी यांच्या वेतनातून कपात करुन सदर रकमेचा भरणा माहितीचा अधिकार लेखाशिर्षा खाली जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.