Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एरंडोल : कर्नाटकात छञपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी येथे संभाजी ब्रिग्रेड,मराठा महासंघ,छावा संघटना व समस्त शिवप्रेमी नागरीक यांच्या तर्फे २१ डिसेंबर रोजी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व तहसीलदार सुचेता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले व कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.
हे आंदोलन नगरसेवक प्रा.मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
निवेदन देतांना प्रा.मनोज पाटील,रविंद्र पाटील,राजू पाटील, डॉ.प्रशांत पाटील,आर.एस.पाटील,मयूर मराठे हितेश जोशी,विनीत महाले,नितीन चौधरी,स्वप्निल सावंत,गुरूदास पाटील,नगरसेवक अभिजित पाटील,राजेन्द्र शिंदे,नरेंद्र भोई,अजय पाटील आदी उपस्थित होते.
छञपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जात, धर्म व प्रांताच्या भिंती कधीच ओलांडल्या गेल्या नव्हत्या,कर्नाटक च्या मुख्यमंत्र्यांनी बंगळुरू येथील छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होऊन माफी मागावी व शिवपुतळ्याच्या अवमानप्रकरणी समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.