Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल बस-आगारातील ६ कर्मचारी कामावर रूजू..!

7



एरंडोल: येथे महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या बस आगारातील ६ कर्मचारी परत कर्तव्यावर रूजू झाले असून त्यात ४ वाहक ,१ चालक कम वाहक व १ मेकँनिक यांचा समावेश असल्याची माहीती आगार व्यवस्थापक विजय एन.पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान..
अजून ही या आगारातील २६३ कर्मचारी संपात सहभागी आहेत.

७ नोव्हेंबर २०२१ पासून सूरू झालेल्या या राज्यव्यापी संपामुळे एरंडोल बस आगाराला कमालिचा फटका बसला आहे.

या संपामुळे एरंडोल बस आगाराचे अंदाजित अडीच कोटीं चे नुकसान झाले आहे.
हे नुकसान कधी ही भरून निघु शकणारे नाही.

संपात असलेले कर्मचारी अद्याप ही एरंडोल बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या तंबूतच ठाण मांडुन बसले आहेत.
तर सर्व बसगाड्या आगाराच्या आवारात दिड महीन्यांपासुन एकाच जागेवर थांबुन संप कधी मागे घेतला जाणार..? या प्रतीक्षेत आहेत.

संपकाळात एस-टी व प्रवासी हे दृढ झालेले समीकरण कमालिचे दुरावलेले आहे.
एस-टी चे प्रवाश्यांशी असलेले नाते पूर्ववत कधी जुळणार..? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकंदरीत ऑटो-रिक्षा,काली-पिली गाड्या या खाजगी वाहनांमध्ये जिव धोक्यात घालुन प्रवास करणे प्रवाश्यांना भाग पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.