Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल-धरणगाव शिक्षक कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रमोद चिलाणेकर यांची निवड..!

5

एरंडोल: येथील एरंडोल-धरणगाव तालुका शिक्षक व कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी आडगाव शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर यांची बिनविरोध निवड झाली.

सहकार पॅनलचा विजय झाला असल्या कारणाने चिलाणेकर हे बहुमताने निवडून आले.सहाय्यक निबंधक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी संजय पाटील यांनी काम पाहिले.संस्था स्थापनेपासून आडगाव शाळेला तिसऱ्यांदा चेअरमनपदाची संधी मिळाली.

यावेळी व्हा. चेअरमन नितीन कळंत्री , संचालक राजू पाटील , हेमंत महाजन , जितेंद्र बोरसे , धनराज मनोरे , नंदलाल भावसार , भारती पाटील , सुषमा बावीस्कर , प्रशांत अहिरे , रविंद्र पाटील , व्ही टी पाटील. मुख्याध्यापक जगदीश पाटील,एस टी पाटील आदी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रिया कामात संस्थेचे चिटणीस चंद्रकांत महाले,मॅनेजर वाल्मिक बोरसे व रवि महाजन यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.