Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल येथे साळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव..!

6

एरंडोल: येथे ‘संकल्प,फाऊंडेशन तर्फे साळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपञ व श्री जिव्हेश्वर पोथीचे वितरण करून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंडीत माधवराव साळी हे होते.
महीला मंडळाच्या अध्यक्षा शोभनाताई साळी,क्षमा वैद्य व पंडीत साळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सर्व महीलांना श्री भगवान जिव्हेश्वर पोथी चे वाटप करण्यात आले.

प्रास्ताविक ‘संकल्प, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा पारोळा येथील साळी समाजाध्यक्ष प्रा.सुभाष आढाव यांनी केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन क्षमा साळी यांनी केले.

यावेळी अनिल आढाव(पारोळा),जगदीश साळी,पूजा साळी,जनाबाई साळी, विनीता साळी,भारती साळी, सुभद्राबाई पेंढारकर,लताबाई साळी, सुनंदाबाई डहाके,सुरेश कापरे,पुष्पलता डहाके,स्वाती साळी,कल्पना साळी,इंदीरा साळी, मीना साळी, अर्चना साळी,रूपाली साळी, छाया मातेरे,दिपा आंबटकर आदी समाजबांधव व महीला उपस्थित होत्या.

साळी समाजाचे संघठन बळकट होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले सोबतच मान्यवर वक्त्यांनी विदयार्थ्यांनी कष्ट व मेहनत घेऊन यशस्वी व्हावे तसेच संकल्प फाऊंडेशनची स्थापना,संस्थेचे आजपर्यंतचे कार्य,मदत व सहकार्य यावेळी विशद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.