Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

धरणगाव येथील पिडीत बालिकांवरील अत्याचाराच्या घटनेचा एरंडोल तालुका तेली समाजातर्फे तीव्र निषेध..!

25

एरंडोल: धरणगाव येथे २ बालिकांवर चंदुलाल शिवराम मराठे या नराधमाने अत्याचार केला. या घटनेचा येथील तेली समाज संघटना व विविध क्षेञातील मान्यवरांतर्फे तीव्र धिक्कार करण्यात आला. शिवसेना महीला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील,माजी नगरसेविका जयश्री पाटील व इतर महीलांच्या हस्ते तहसिलदार सुचिता चव्हाण यांना बुधवारी २३ फेब्रुवारी२०२२ रोजी निवेदन देण्यात आले.
आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनावर पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी व रमेश परदेशी,प्रा.मनोज पाटील,हरीश्चंद्र चौधरी,आनंदा चौधरी,तेली समाजाचे तालुकाध्यक्ष गुलाब चौधरी,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,नत्थू चौधरी, नितीन चौधरी, रविंद्र चौधरी,चंद्रकांत चौधरी,अनिल चौधरी, किशोर चौधरी,लक्ष्मण महाजन,समाधान कोळी, नितीन पाटील,सुनिल चौधरी, भूषण चौधरी, अविनाश ठाकूर,तालुकासचिव आर.डी चौधरी आदी नागरीकांच्या स्वाक्षर्या असुन निवेदन देतांना शहरातील समस्त तेली समाजबांधव व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिडीतांच्या कुटंबियांना संरक्षण मिळावे,सदरील खटला फास्ट ट्रँक कोर्टात चालवुन अत्याचार करणार्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.