Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल येथे राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांची जयंती साजरी..!

15


एरंडोल: येथे परीट(धोबी) समाजसेवा व बहुउद्देशिय संस्थेतर्फे २३फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रसंत गाडगेमहाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी हे होते. जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील हे प्रमुख अतीथी म्हणुन उपस्थित होते.

कोविड काळात उल्लेखनिय कार्य करणारे प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार सुचिता चव्हाण, डॉ.फिरोज शेख,डॉ.कैलास पाटील व इतर अधिकार्यांना सन्मानपञ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच परीट समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

अमोल पाटील यांच्या हस्ते प्रतीमापुजन करण्यात आले.
याप्रसंगी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,किशोर निंबाळकर, आनंदा चौधरी,विठ्ठल आंधळे, सुनिल चौधरी, राजेंद्र शिंदे, राजेंद्र पाटील, बबलू चौधरी, मनोज पाटील, नरेंद्र पाटील, कुणाल महाजन, अतुल महाजन, कृष्णा ओतारी, अमोल भावसार, शालिग्राम गायकवाड, परीट समाजाचे श्याम जाधव, किरण निकुंभ, नितीन तेलंगे, रोहीदास वाघ, अजय महाले, आबा महाले, निलेश सुर्यवंशी, अमोल शिरसाळे,प्रशांत पाटील,आर.डी.पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते.

प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर यांनी केले, सुञसंचालन योगेश वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदिप सुर्यवंशी यांनी केले.

या निमित्ताने शहरातील राष्ट्रपुरूष छञपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले तसेच आदल्या दिवशी कासोदा दरवाजा परीसरातील स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.