Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल बस आगारातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा..!

7



एरंडोल: येथे बसआगार प्रशासनातर्फे बसस्थानकावर मराठी भाषा गौरव दिन २७फेब्रुवारी २०२२ रविवार रोजी साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विजय पाटील हे होते. कविवर्य कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांच्या प्रतीमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात झाली.
यावेळी प्रवाश्यांचा गुलाबपुष्प व खडीसाखर देऊन गौरव करण्यात आला.

दैनंदिन वापरात मराठी भाषेचा वापर करून मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याचे प्रवाश्यांना आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी जगदीश पाटील व तुषार सोनवणे हे प्रमुख अतीथी म्हणुन उपस्थित होते.

प्रास्ताविक स्थानक प्रमुख गोविंद बागुल यांनी केले, सुञसंचालन सतीष महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.

यावेळी प्रमोद चौधरी, एस-टी कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.