Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल येथे एस-टी संपकाळात असेही ‘ट्वेन्टी-ट्वेन्टी, ..!

7



एरंडोल: हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांबणार्या राज्यव्यापी एस-टी संपकाळात २७फेब्रुवारी २०२२ रोजी येथील बसआगारात कर्तव्यावर परत आलेल्या वाहक व चालकांची संख्या २०-२० झाली त्यामुळे एस-टी कर्मचार्यांमध्ये सदर ट्वेन्टी-ट्वेन्टी चर्चेचा विषय ठरली आहे.

एरंडोल बस आगाराच्या कार्यक्षेञात फेब्रुवारी२०२२ अखेर ५९ एस-टी कर्मचारी कामावर परतले आहेत.
तथापी अजुनही १८३ कर्मचारी स्थानक प्रवेशद्वारातील संपाच्या तंबूत तळ ठोकुन आहेत.

शनीवारी २६फेब्रुवारी रोजी ५चालक व ६ वाहक संपाच्या तंबू मधुन परतले आहेत. त्यामुळे कर्तव्यावरील वाहक संख्या २० व चालक संख्या देखील २० पर्यंत पोहोचली आहे.

संपकाळात यापुर्वी कर्तव्यावर परतलेल्या कर्मचार्यांची संख्या पाहता कधी ‘वन टू का फोर, तर कधी.. ‘१२-१३, अश्या चर्चा कर्मचार्यांच्या गोटात रंगतदार ठरल्या आहेत.

दरम्यान.. ग्रामीण भागातील प्रवासी बससेवेअभावी बेहाल झाले आहेत तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसुन अवैध प्रवासी वाहतुक करणार्या वाहनांनी शाळा, महाविद्यालये गाठावी लागत आहेत. तश्यात एरंडोल बसआगाराचे रोजचे ४ते५ लाख रूपयांचे उत्पन्न बुडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.