Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल येथे महायोध्दा एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी..!

7



एरंडोल: येथे १मार्च २०२२ मंगळवार रोजी श्रेष्ठ धनुर्धारी, महादंड नायक,भगवान एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी उत्साहात साजरी करण्यात आली.
भगवान एकलव्य जयंतीचे औचित्य साधून महायोध्दा एकलव्य ग्रृप व भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे केवडीपुरा भागातील भगवान एकलव्य यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
यावेळी म्हसावद नाका व श्रीराम नगर येथील भगवान एकलव्य मंदिरातील प्रतिमांचे पुजन करुन कासोदा नाका- मेन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सुरेश दाभाडे,आनंद दाभाडे,कामगार नेते सुरेशजी सोनवणे,अमोल तंबोली,शिवाभाऊ पहेलवान,धम्मा पहेलवान,राजू चौधरी,संभाजी पाटील, महायोध्दा एकलव्य ग्रृप चे संस्थापक अध्यक्ष तथा भिल समाज विकास मंच चे राज्य संपर्क प्रमुख दिपक अहिरे, एरंडोल पोलिस स्टेशनच्या अधिकारी-कर्मचारी आदी मान्यवरांनी अभिवादन केले.
मोटारसायकल रँलीप्रसंगी खंडु बोरसे,भोलानाथ महाले,शंकर बोरसे,लक्ष्मण बागुल,किशोर गायकवाड,लहु सोनवणे,
विनोद मोरे,विनोद पवार,किरण मोरे,सुकलाल बागुल,मोतीराम मालचे,सागर वाघ,निहाल सोनवणे,भैय्या मोरे,महेंद्र सोनवणे,समाधान अहिरे,विक्रम वाघ,इच्छाराम सोनवणे,मधुकर सोनवणे,ईश्वर सोनवणे,सुनिल मोरे,भैय्या मोरे आदींचे अनमोल सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.