Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयशर च्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार, पिंपळकोठा खु! येथे शेंडीच्या कार्यक्रमावर दुखाचे सावट..!

5



एरंडोल: तालुक्यातील पिंपळकोठा खुर्द येथे राजू करनोर यांच्या मुलाच्या शेंडी उतरविण्याचा कार्यक्रम सूरू असताना त्यांचा चुलतभाऊ शुभम बापू हटकर वय-२२ वर्षे हा दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जळगावकडे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पेट्रोलपंपावर गेला. पेट्रोल भरून घराकडे परतत असतांना आयशर गाडीने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली त्यात शुभम हटकर हा जागीच गतप्राण झाला.
ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पिंप्री-पिंपळकोठा खुर्द फाट्यापासुन थोड्या अंतरावर असलेल्या कृष्णाई ढाब्यासमोर घडली.
या घटनेचे वृत्त कळताच पिंपळकोठा बु! व खुर्द या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
शुभमच्या अपघाती मृत्यू मुळे त्याच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे.
दरम्यान् ..
अपघातग्रस्त ट्रकचालकाने माञ घटनास्थळावरून पळ काढला.

दुचाकी क्रमांक एम.एच.19 डी. जे.1204 तर ट्रक क्रमांक एम. एच. 48 ए.वाय.4951 असा आहे.
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व त्यांचे सहकारी हे अपघातस्थळी पोहोचल्यावर जमलेल्या ग्रामस्थांच्या मदतीने जवळपास अर्ध्या तासापासुन राष्ट्रीय महामार्गावरील ठप्प झालेली वाहतुक सुरळीत करण्यात आली.

शुभम याचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रूग्णालयात नेण्यात येऊन वैद्यकीय अधिक्षक डॉ. कैलास पाटील,डॉ.मुकेश चौधरी व डॉ.तन्मय महाले यांनी शवविच्छेदन केले.

शुभमच्या पार्थिवावर राञी उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेंडी उतरविण्याच्या कार्यक्रमातील उत्साहावर विरजण पडले व शुभमच्या कुटुंबियांसह कार्यक्रमास आलेल्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

शुभम हा ट्रँक्टरचालक म्हणुन हातमजुरी करीत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.