Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शॉर्ट्स कपडे घालून फिरल्याच्या कारणावरून आयटी इंजिनिअर तरुणींना चप्पलने मारहाण. पुण्यातील घटना

10

पुणे,दि.०४ :- पुण्यातील चंदननगर परिसरात शॉर्ट्स कपडे घालून फिरत असल्याच्या करणावरुन आयटी इंजिनिअर तरुणींना चप्पलांनी मारहाण केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे भाड्याच्या सदनिकेमध्ये राहणाऱ्या आयटी कंपनीतील तरुणी केवळ शॉर्ट्स कपडे परिधान करीत असल्याने सोसायटीतील लोकांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबरोबरच घरमालकीणीलाही शिवीगाळ केली आहे. विशेषतः मारहाण झालेल्या तरुणी परप्रांतीय आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तीन महिलांसह सहा जणांना अटक केली आहे.
अलका किसन पठारे, शीतल कमलेश पठारे, सीमा बाळासाहेब पठारे, सचिन किसन पठारे, केतन बाळासाहेब पठारे, किरण सचिन पठारे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी ज्योती संजय येळे (रा. लेक्‍सीस सोसायटी, खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी येळे यांची खराडीतील रक्षकनगर परिसरातील लेक्‍सीस सोसायटीमध्ये सदनिका आहे. त्यांनी त्यांची सदनिका आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन परप्रांतीय तरुणींना भाडेतत्वावर राहण्यासाठी दिली आहे.दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीही त्याच सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. संबंधित तरुणी शॉर्ट्स कपडे परिधान करून ये-जा करतात. त्याचा रहिवाशांना त्रास होतो, असा आरोप करीत संबंधित महिला व पुरुष बुधवारी रात्रीच्या सुमारास फिर्यादीच्या सदनिकेमध्ये शिरले. त्यांनी फिर्यादीच्या सदनिकेमध्ये राहणाऱ्या तरुणींना शिवीगाळ करीत चप्पलने मारहाण केली. तसेच फिर्यादी येळे यांनाही त्यांनी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोहर सोनवणे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.