Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- विश्व हिंदू परिषदेचे वारीसाठी भजन आंदोलन
- वारीसाठी परवानगी देण्याची मागणी
- नागपुरात आंदोलनाला सुरुवात
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता आषाढी वारीसाठी राज्य सरकारने पायी वारीवर निर्बंध आणले आहेत. शासनाकडून खबरदारी म्हणून केवळ मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाचा विविध आध्यत्मिक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. अध्यात्मिक आघाडीनंतर आता विहिंपनं देखील पायी वारीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी विहिंपनं भजन आंदोलन पुकारलं आहे.
वाचाः धर्मांतरण रॅकेटचे नागपूर कनेक्शन; उत्तर प्रदेश एटीएसची मोठी कारवाई
विश्व वारकरी सेवा संस्थेनंही या आंदोलनात भाग घेतला आहे. राज्यातील मंदिरे उघडण्यात यावे यासाठी संविधान चौकात दिंडी भजन आंदोलन करण्यात आले. तसंच, मर्यादित संख्येमध्ये पंढपूरची पायी वारी करू देण्यात यावी, या मुख्य मागण्यांच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात शहरातील कीर्तनकार, भजन मंडळी, निरुपणकार, साधूसंतांनी शनिवारी संविधान चौकात भजन आंदोलन केले.
वारी रद्द करण्याच्या निर्णयाची आठवण सदैव रहावी, या उद्देषाने जिल्हाधिकारी कार्यालयात विठ्ठल वृक्ष लावण्यात आले. त्या रोपट्याचे संगोपन करण्याची जबाबदारी विहिंपने घेतली आहे.
वाचाः मनसेसोबत जाण्याचा निर्णय योग्यवेळी; फडणवीसांनी दिले युतीचे संकेत?
काय आहे वारकऱ्यांचे म्हणणे?
मानाच्या दहा पालख्यांसोबत लहानमोठ्या चारशे पालख्या असतात. त्या प्रत्येक पालखीसोबत किमान चार जणांना परवानगी देण्यात यावी, मानाच्या पालखीसोबत पन्नास जणांना पायी वारी करू द्यावी, एकादशीनंतर पुढील पंधरा दिवस दररोज दहा ते वीस वाऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन करू द्यावे, लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना वारी करू द्यावी, आरटीपीसीर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य करावा, एकादशीपासून संपूर्ण राज्यातील मंदिरांमध्ये चातुर्मास सेवा आणि इतर धार्मिक अनुष्ठान पन्नास टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास अनुमती द्यावी, या मागण्या वारकऱ्यांनी केल्या आहेत.
वाचाःमनसेत घडामोडींना वेग; अमित ठाकरेंवर नाशिकची जबाबदारी?