Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई : शाहरुख खानच्या ‘पठाण’ची मोठ्या पडद्यावर तुफान चर्चा आहे. सिनेमाने आपल्या पहिल्याच दिवशी रेकॉर्डतोड कमाई केली आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने वर्ल्ड वाइड १०० कोटींचा आकडा पार केला. जवळपास २५० कोटी बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा ५ दिवसांत २०० कोटी कमाई करेल असा अंदाज आहे. शाहरुखची, त्याच्या सिनेमाची देशभरासह विदेशात चर्चा आहे. पठाण बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असताना दुसरीकडे शाहरुखचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख त्याला त्याच्या आईने दिलेले ५००० रुपये हरवले असल्याचा सांगत आहे.
या व्हिडिओमध्ये शाहरुख त्याचा जुना किस्सा सांगतोय दिसतोय. ‘ख्वाजा गरीब नवाजवर आम्ही चादर घेऊन जात होतो. मम्मीने मला ५००० रुपये सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते. ते पैसे माझ्याकडून हरवले. मी ते पैसे शोधण्यासाठी फिरत होतो, त्यावेळी तिथे एक फकीर बसले होते. त्यांनी मला काही हरवलं आहे का असं विचारलं. त्यावर मी हो म्हणालो. त्यांनी मला पाच हजार रुपये हरवले का? असा प्रश्न विचारला.’
पुढे व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं, की ‘मला वाटलं त्यांना कसं समजलं. पण त्या व्यक्तीने सांगितलं, की इथून कोणीही रिकाम्या हाती जात नाही. ५००० रुपये हरवले आहेत, ५०० कोटी कमावशील’ असं तो व्यक्ती शाहरुखला म्हणाला होता.
हेही वाचा – आईचं मंगळसूत्र घालून परफॉर्म करतो हा सुपरस्टार सिंगर, कारण वाचून तुमच्या डोळ्यातही येईलं पाणी
हेही वाचा – पठाणसाठी शाहरुख खानने १०० कोटी घेतले? ३० वर्षांपूर्वी डेब्यू सिनेमासाठी मिळालेली केवळ इतकी फी
शाहरुखचा हा थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर शाहरुखचे चाहते अनेक प्रतिक्रिया देत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
आगामी सिनेमे
शाहरुखच्या ‘पठाण’मध्ये दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत आहेत. त्याशिवाय डिंपल कपाडिया, आशुतोष राणासारखे कलाकारही भूमिका साकारताना दिसत आहेत. सिनेमाने मोठी कमाई केली आहे. ‘पठाण’नंतर शाहरुख राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सिनेमात शाहरुखसोहत तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत असेल. २२ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.
त्याशिवाय शाहरुख ‘जवान’ सिनेमातूनही मोठ्य पडद्यावर येणार आहे. हा सिनेमा २ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.