Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गुन्हेगार पार्श्वभुमी असलेल्या १४ गुन्हेगारास हद्दपार..
तेज पोलीस टाइम्स – परवेज शेख
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त, पुणे शहर म्हणुन कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करून संघटीत गुन्हेगारी करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ४ मधील पोलीस स्टेशनचे गुन्हें अभिलेखावर खुनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, महिलांवरील अत्याचार, बेकायदेशिर शस्त्रजवळ बाळगणे, अवैध जुगार चालविणे, अवैध दारुविक्री करणे व अंमली पदार्थ विक्री करणारे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकार्ड वरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक रहावा म्हणुन संबंधीत पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन पोलीस उप आयुक्त, परि- ४ पुणे शहर यांनी प्रस्तावाची चौकशी पुर्ण करुन खालील नमुद १४ गुन्हेगाराविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५६ प्रमाणे पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयातुन तडीपार आदेश केलेले आहेत.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपी मध्ये येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील १) मनोज भगवान कांबळे, वय ४८ वर्षे, रा.स.नं.८ यशवंतनगर येरवडा पुणे, २) ईस्माईल रियाज शेख वय २२ वर्षे रा. गल्ली नं १५ राजीव गांधी नगर झोपडपट्टी येरवडा पुणे, ३) देवीबाई रमेश राठोड, वय ४५ वर्षे, रा. नाईकनगर येरवडा पुणे, ४) सुमन मोहन नाईक वय ५० रा.स.नं. १४ नाईक नगर येरवडा पुणे, ५)भारती कृष्णा चव्हाण वय ३२ रा. स.नं. १४ नाईक नगर येरवडा पुणे, ६) कमल राजु चव्हाण वय ५० रा. स.नं. १४नाईक नगर येरवडा पुणे ७) लक्ष्मी गोपाळ पवार वय ४६ वर्षे, रा. स.नं. १४ नाईक नगर येरवडा पुणे ८) मोहित ऊर्फ बिटया संजय सुर्यवंशी वय २३ रा. स.नं. १९१ नागपुर चाळ येरवडा पुणे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील ९ ) सुरज ऊर्फ गुंडया मनोहर माचरेकर वय ४० रा. भिमनगर विश्रांतवाडी पुणे, १० ) दिलीप गोविंद सुर्यवंशी वय ३१ वर्षे, रा. काशीद चाळ कळस विश्रांतवाडी पुणे, ११) विवेक चंद्रकांत चव्हाण वय २७ वर्षे रा. बौध्द विहारा जवळ भारतनगर येरवडा पुणे, खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील १२ ) गौरव दिपक मिसाळ वय २१ वर्षे रा.घर नं ६९ इंदिरानगर वसाहत खडकी पुणे, लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील १३ ) नगनाथ संभाजी गिरी वय १९ वर्षे रा.दुर्गामाता मंदिरा जवळ खराडी पुणे, चतुश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील १४) जावेद जानशा शेख वय ५३ वर्षे रा. मंजाळकर चौक वडारवाडी पुणे यांचा समावेश आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. या पुढील काळात देखील पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ-४ हद्दीतील रेकॉर्डवरील क्रियाशिल गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतीबंधक कारवाई करुन गुन्हेगारीस प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येणार आहे..