Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुलींसाठी पहिली भारतीय शाळा उघडली, समाजव्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला; सावित्रीबाई फुलेंचे आपल्यावर अनंत उपकार

14

Savitribai Phule Birth Anniversary: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी साजरी केली जाते. तर १० मार्च ही त्यांची पुण्यतिथी असते. समाजसुधारक आणि महिलांसाठी काम करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. १९व्या शतकात समाजात प्रचलित असलेल्या अत्याचारी समाजव्यवस्थेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. तर्कसंगतता आणि सत्य, समानता आणि मानवता यासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महत्वाच्या घटना जाणून घेऊया.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रात (नायगाव – सातारा) येथे झाला. त्या कुटुंबातील सर्वात लहान सदस्य होत्या. त्यांना एकूण तीन भावंडे होती. त्या माळी समाजाच्या होत्या, जो वर्ग आज आज इतर मागासवर्गीय (OBC) मध्ये येतो. त्यावेळच्या समाजव्यवस्थेप्रमाणे नऊ वर्षांच्या असताना त्यांचे लग्न झाले. सावित्रीबाईंना लिहिता-वाचता येत नव्हते. त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या घरी शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात असमानता, पितृसत्ता आणि सामाजिक दडपशाहीशी लढण्यासाठी काम केले.

वर्ष उलटूनही पीएचडी प्रवेश नाही; १५ जानेवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

पुण्यातील भिडे वाड्यात पहिली शाळा सुरू

सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत १८४८मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली. शाळेत सुरुवातीला फक्त नऊ मुली होत्या. हळूहळू संख्या वाढून २५ झाली. त्यांच्या शाळेत शिकवल्या जाणार्‍या अभ्यासक्रमात वेद आणि शास्त्रासारख्या ब्राह्मणी ग्रंथांऐवजी गणित, विज्ञान आणि सामाजिक अभ्यासांचा समावेश होता.

फुले जोडप्याने १८५१ पर्यंत शहरात आणखी तीन शाळा सुरू केल्या. ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी मुलींसाठी १८ शाळा उघडल्या. महिलांच्या हक्कांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी १८५२ मध्ये महिला सेवा मंडळ उघडले. ज्योतिराव फुले यांच्यासमवेत त्यांनी गर्भवती बलात्कार पीडितांसाठी केअर सेंटर उघडले. या केंद्राचे नाव ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ असे होते. १८५० मध्ये ज्योतिराव फुले यांच्यासह सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात नेटिव्ह फिमेल स्कूल आणि सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ द एज्युकेशन ऑफ महार, मांग्स आणि इ. या दोन शैक्षणिक ट्रस्टची स्थापना केली.

वर्षभरात विद्यार्थ्यांना केवळ विलंबाचाच फटका, उच्च शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.