Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एप्रिलमध्ये भारतात लॉन्च होणार Vivo X90 आणि Vivo X90 Pro, किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत सर्व काही एका क्लिकवर

6

नवी दिल्ली :Vivo X90 and Vivo X90 Pro : विवो कंपनी लवकर नवीन दमदार मॉडेल्स भारतात लॉन्च करत आहेत. Vivo X90 सीरिजमधील फोन एप्रिल महिन्यात लॉन्च केले जातील. या सीरिजमध्ये Vivo X90, Vivo X90 Pro हे फोन सादर केले जाणार आहेत. रिपोर्टनुसार, हे दोन्ही फोन 26 एप्रिल रोजी भारतात लॉन्च केले जातील. हे फोन तसं पाहायला गेले तर हाय-बजेट असणार असून त्यांची किंमत 60 हजार ते 80 हजारांपर्यंत असू शकते.

Vivo X90 आणि Vivo X90 Pro मध्ये हे फीचर्स असण्याची शक्यता

दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच फुल-एचडी + (1260x 2800 पिक्सेल) AMOLED स्क्रीन असेल. त्याचा रिफ्रेश दर 120 Hz पर्यंत आहे. हे Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर कार्य करते. फोनमध्ये MediaTek Dimensity 9200 SoC प्रोसेसर दिला जाईल.

दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा दिला जाऊ शकतो. Vivo X90 मध्ये 50-megapixel Sony IMX866 प्राथमिक सेन्सर, 12-megapixel पोर्ट्रेट कॅमेरा आणि 12-megapixel अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आहे. त्याच वेळी, Vivo X90 Pro मध्ये 50-megapixel Sony IMX989 प्राथमिक सेन्सर, 50-megapixel 50mm IMX758 सेन्सर आणि 12-megapixel अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आहे. दोन्ही फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.

वाचाः Phone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Vivo X90 मध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4810mAh बॅटरी आहे. तर दुसरीकडे Vivo X90 Pro 120W जलद चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसाठी 4870mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo X90 आणि X90 Pro ची किंमत किती?

या दोन्ही फोन्सची नेमकी किंमत अजून समोर आलेली नाही. पण दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स पाहता अंदाजानुसार Vivo X90 आणि Vivo X90 pro ची किंमत 69,221 आणि Rs 99,162 च्या दरम्यान असेल. भारतात या गॅझेट्सची किंमत किती आहे हे मात्र अद्याप कळलेले नाही.

वाचा: कमी बजेटमध्ये स्मार्टफोन हवाय? टेन्शन नाही, १० हजार रुपयांच्या आत आहेत हे ५ बेस्ट स्मार्टफोन्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.