Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वेगवेगळ्या रेशनींग दुकानातून माल खरेदीकरून काळ्याबाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या तिघांना खडक पोलिसांनी अटक केली

21

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

Khadak Police Action : वेगवेगळ्या रेशनींग दुकानातून माल खरेदीकरून काळ्याबाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या तिघांना खडक पोलिसांनी Khadak Police Station अटक केली आहे. पुण्यात रेशनींग अन्न धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पोलिसांकडून पाऊले उचलण्यात येत आहेत.

दि. ११ रोजी पुण्यातील रेशनींग दुकातील माल खरेदीकरून दौण्ड येथे काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याबाबत खडक पोलिसांना माहिती मिळाली होती. यावेळी राजीव गांधी सोसायटी, काशेवाडी, भवानी पेठ पुणे येथे रेशनिंग मालाने भरलेला टेम्पो MH12PQ0582 आढळून आला. टेम्पोतील मालाची पाहणी केली असता सदर माल रेशनींगचा असल्याचे आढळून आले.

आरोपी जावेद लालू शेख, रा.काशेवाडी, अब्बास अब्दुल सरकावस व इम्रान अब्दुल शेख यांच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुरन. ११८/२०२३ जीवनावश्यक वस्तू कायदा क ३(१),(२)(डी)(इ), ७ (१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपींनी कोणकोणत्या रेशनिंग दुकानातून माल विकत घेतला याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.