Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Facebook Care : हॅकर्सच्या वाईट नजरेपासून तुमचं फेसबुक अकाउंट वाचवायचंय? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

44

Facebook Account Care :सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणजे फेसबुक. जगभरातील अनेकजण या सोशल मीडिया प्लॅटफर्मवर आहेत. आपल्या देश-विदेशातील मित्र-मैत्रीनींसह कुटुंबीयांशी तसंच सोबत काम करणाऱ्या आपल्या शेजार-पाजारील ओळखीच्या व्यक्तींशी डिजिटली कनेक्ट राहण्यासाठी फेसबुकचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात केला. मागील कितीतरी वर्षे फेसबुकवर लोक एन्जॉय करत आहेत. सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म असल्याने अनेक अकाऊंट्स देखील फेसबुकवर आहेत, लोकांची बरीच माहिती यावर आहे. ज्यामुळे अकाऊंट हॅक होण्याची शक्यताही खूप आहे. कितीतरी वेळा आपण आपल्या आसपास या हॅकिंगच्या घटना पाहिल्या असतील. पण जर काही सोप्या बेसिक सुरक्षिततेच्या स्टेप्स आपण फॉलो केल्या तर फेसबुक खाते सुरक्षित ठेवता येईल. तर याच संबधित काही सोप्या स्टेप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

​संशयास्पद लिंक्सवर अजिबात क्लिक करु नका

फेसबुक स्वत:च युजर्सना तुम्हाला मिळालेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका असा सल्ला देते. विशेषत: जर ते तुम्हाला माहीत नसलेल्या लोकांद्वारे लिंक आली असेल तर अजिबातच क्लिक करु नाका. अशावेळी, ही अनोळखी लिंक उघडण्यापासून, त्यावर क्लिक करण्यापासून करण्यापासून स्वतःला थांबवा. ही एक व्हायरस असणारी लिंक असू शकते ज्यामुळे तुमची सिस्टीम खराब होईल तसंच हॅकर्सचं जाळंही असेल तुम्हाला अडकावयला ज्यामुळे लिंकवर क्लिक करताच तुमची सर्व माहिती त्यांच्याकडे पोहोचू शकते.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

​अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका​

​अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका​

तुम्ही ओळखत नसलेल्या लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका अशी शिफारस फेसबुकद्वारे केली जाते. अनोळखी व्यक्तींना रिक्वेस्ट पाठवू नका आणि त्यांची रिक्वेस्ट स्वीकारु नका असे दोन्ही सजेशन दिले जातात. कधी कधी हॅकर्स हे बनावट खात्यांसह तुमचं अकाऊंट हॅक करु शकतात. अशा फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याने तुम्ही त्यांना तुमच्या पर्सनल अकाऊंटमध्ये येऊ देता ज्यामुळे त्यांना अकाऊंट हॅक करणं अधिक सोपं होऊ शकतं. तसंच अनेकदा पोस्टमध्ये टॅग करुनही तुम्हाला आपल्या जाळ्यात हॅकर्स अडकवू शकतात.

​वाचाःJio ची भन्नाट ऑफर, ९१ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत OTT आणि बरच काही…

​टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन करा

​टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन करा

तर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) ही एक अत्यंत महत्त्वाची आणि सोपी कृती आहे ज्यामळे तुमचं फेसबुक अकाउंट सुरक्षित राहण्यासाठी बराच फायदा होईल. हे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन केल्यावर भविष्याच कधीही अनोळखी डिव्हाइसवरून लॉग इन करताना तुम्हाला तुमची ओळख दाखवावी लागते. त्यासाठी ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर वेरिफिकेशन केले जाते.

​वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

कधीही स्ट्राँग पासवर्ड वापरा

कधीही स्ट्राँग पासवर्ड वापरा

पासवर्ड हे हॅकर्सच्या विरूद्ध तुमच्या सुरक्षिततेचे पहिले पाऊल आहे. त्यामुळेच तुम्ही एक मजबूत आणि युनिक पासवर्ड निवडणे महत्वाचे आहे. पासवर्ड असा असावा ज्याचा अंदाज लावणं ही सोप नसेल. पण सोबतच तुम्हाला तो लक्ष्यात ठेवताही आला पाहिजे. तुमची जन्मतारीख, नाव, कार नंबर इत्यादींचा पासवर्ड म्हणून कधीही वापर करू नका. तसेच तुमच्या Facebook खात्याचा पासवर्ड इतर सेवांवर पुन्हा वापरू नका किंवा इतरांशी शेअर करू नका. असं केल्यास तुमचा पासवर्ड लिक होऊन अकाउंट हॅक होण्याची भिती असते.

प्रोफाईल लॉक ऑप्शनही फायद्याचा

प्रोफाईल लॉक ऑप्शनही फायद्याचा

आजकाल फेसबुक प्रोफाईल लॉक करण्याची पद्धत आली आहे. फेसबुकने ही पद्धत आली आहे. अनेकजण याचा वापरही करत आहेत. जर तुम्हालाही तुमचं अकाऊंट अगदी मर्यादीत व्यक्तींसाठी ठेवायचं असल्यास प्रोफाईल लॉक हे फीचर वापरु शकता. प्रोफाईल लॉक केल्यावर इतर कोणही तुमच्या बेसिक माहितीशिवाय अधिक माहिती , पोस्ट आणि फोटो पाहू शकत नाही.

वाचा : ​सॅमसंगचा नवा-कोरा Samsung M14 5G लॉन्चसाठी सज्ज, हे फीचर्स झाले कन्फर्म

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.