Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोंढवा : जागा बळकावण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या मोठ्या बिल्डरवर गुन्हा दाखल

43

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

कोंढवा येथील गगन एमरल्ड सोसायटीतील ॲमिनिटी स्पेसवर अतिक्रमण करून खोटी कागदपत्रे सादर करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोठ्या बिल्डरसह राजकिय हस्तकांना पुणे पोलीसांकडून मोठा दणका देण्यात आला आहे. गगन एमरल्ड सोसायटीतील ॲमिनीटी स्पेस बेकायदेशीर रित्या विक्री करून त्याचा बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिल्डर व राजकिय हस्तकांविरोधात फिर्यादी आबिद रफिक सज्जन यांनी कोर्टाकडे धाव घेतली होती. यावेळी कोर्टाने बिल्डर व इतर विरूद्ध तात्काळ गुन्हा नोंदविण्यासाठी आदेश काढले होते.गगन एमरल्ड मौजे कोंढवा खुर्द सर्व्हे नंबर 62 हिस्सा नंबर 4 सब हिस्सा 38 ते 40,43 ते 53,55 व सर्व्हे नं.62 हिस्सा नंबर 8 पार्ट या जागेतील ॲमिनीटी स्पेस बेकायदेशीर रित्या बळकावू पाहणाऱ्या बिल्डर व राजकिय हस्तकांना मोठा धक्का बसला आहे.याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुरनं. 527/2023 भादवि कलम 420, 406, 468, 469, 471, 120 ब, 447, 504, 506 अन्वये आरोपी सुशिल अगरवाल, घनश्याम अगरवाल व विशाल अगरवाल व रफिक टोपी, करीम कल्लु खान, अनिस रशिद सुंडके यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.