Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारीच! उन्हात गेल्यावर या फोनचा कलर आपोआप बदलणार, १६ जीबीचा तगडा रॅम, ८७९९ रुपये किंमत

9

नवी दिल्ली :itel s23 Smartphone : एकेकाळी फक्त कॉलिंग किंवा एसएमएस पाठवण्यासाठी साधे फोन येत होते. पण काळानुरुप फोनमध्ये एकापेक्षा एक दमदार फीचर्स येऊ लागले. त्यासोबतच फोनचा लूकही बदलू लागला आजकाल फोन पूर्णपणे स्क्रिनटच येत असून बटणं पूर्णपणे गायब झाली आहे. पण आता तर आयटेल या कंपनीने एक असा भारी फोन काढला आहे, ज्याचा रंग आपोआप बदलतो. itel S23 हा स्मार्टफोन कंपनीने लाँच केला असून हा फोन उन्हात किंवा युव्ही लाईटमध्ये गेल्यावर फोनच्या बॅक पॅनलचा रंग बदलतो आहे. विशेष म्हणजे हा फोन किंमतीत ९००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत असून यामध्ये तब्बल १६ जीबी रॅम दिला गेला आहे. चला तर या फोनबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह ६.६ इंचाचा दिला गेला आहे. या फोनची बॅटरी 5000mAh इतकी असून प्रायमरी कॅमेरा थेट ५० मेगापिक्सलचा आहे. तसंच ८ मेगापिक्सलचा फर्टं कॅमेराही आहे. प्रोसेसरचं म्हणाल तर यूनिसोक T606 प्रोसेसर अँन्ड्रॉईड १२ वर काम करणार आहे.

तब्बल १६ जीबी रॅम
भारतात सध्यातरी अधिक फोन हे ८ जीबी ते १२ जीबी रॅमचेच आहेत. पण हा itel s23 Smartphone थेट १६ जीबी रॅमसह कंपनीने दिला आहे. याच्या बेस व्हेरियंटमध्ये १२८ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम तर आणखी ४ जीबी व्हर्च्यूवल रॅमही आहे. तसंच टॉप व्हेरियंट १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीही रॅमसह ८ जीबी व्हर्च्यूवल रॅमसह येत आहे. तसंच साइड माउंटेड फिंरप्रिंट स्कॅनर आणि चार्जिंगसाठी युएसबी टाईप-सी पोर्टही दिला गेला आहे. 5000mAh ची बॅटरी फोनमध्ये आहे.

किंमतीचं काय?
फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये असून स्टाररी ब्लॅक आणि मिस्ट्री व्हाईट असे हे दोन रंग आहेत. यातील व्हाईट कलरवाला फोन उन्हात गेल्यावर रंग बदलून पिंक होणार आहे. तर या फोनच्या १६ जीबी रॅमवाल्या मॉडेलची किंमत ८,७९९ रुपये असून ८ जीबी रॅमवाला फोन ८,१९९ रुपयांना मिळेल. याची विक्री १४ जूनासून सुरु होणार आहे.

वाचा : iOS 17 Update ने आयफोनचा चेहरामोहरा बदलणार, १० खास फीचर्सनी फोन होणार आणखी खास :

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.