Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Android युजर्स कायम करतात ‘या’ ५ चूका, आताच टाळा नाहीतर स्मार्टफोन होईल खराब

11

1. अ‍ॅप्स वारंवार बंद करणे

आजकाल अधिक मेमरी खातात म्हणून आपण प्रत्येक अ‍ॅप हे पूर्णपणे बॅकग्राऊंडमधून बंद करतो. पण पण अ‍ॅप अशाप्रकारे बंद केल्यावर मेमरी देखील काढून टाकली जाते आणि पुढील वेळी अ‍ॅप उघडण्यास जास्त वेळ लागतो. अशा स्थितीत बॅकग्राउंडमध्ये काही अ‍ॅप्स ओपन ठेवले तरी काही हरकत नाही. त्यामुळे मेमरी वाचते आणि फोन लवकर खराब होत नाही.

वाचा : Redmi कंपनीनं आणला स्वस्तात मस्त फोनचा नवा व्हेरियंट, कमी किंमतीत फीचर्स जास्त

2. बनावट बॅटरी किंवा रॅम बूस्टर वापरणे​

2-

गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक अ‍ॅप्स आहेत जे तुमचा फोन क्लिन करतात असं सांगितलं जातं. हे अ‍ॅप्स फोनची बॅटरी आणि रॅम वाढवण्याचा दावा करतात. यापैकी बरेच अ‍ॅप हे पूर्णपणे निरुपयोगी आहेत. यापैकी अनेक मालवेअर देखील असू शकतात. ते तुम्हाला जाहिराती दाखवतात आणि तुमची फसवणूक करु शकतात. त्यामुळे असे अ‍ॅप्स डिव्हाइसवर डाउनलोड करू नयेत.

​वाचा : Virus Attack : ‘या’ अँन्ड्रॉईड अ‍ॅप्समध्ये आढळला धोकादायक Anatsa ट्रोजन, ६०० हून अधिक बँकिंग अ‍ॅप्सही धोक्यात

3. अ​ननोन सोर्सकडून अ‍ॅप्स इन्स्टॉल करणे

3-

काहीवेळा जेव्हा तुम्हाला Google Play वर एखादे अ‍ॅप किंवा गेम सापडत नाही, तेव्हा तुम्ही थर्ड पार्टी वेबसाइटवरून APK फाइल डाउनलोड करता. या वेबसाइट्सवरील अॅप्सची पडताळणी केलेली नसते. त्यामध्ये स्पायवेअर व्हायरस असू शकते आणि यामुळे फोनला धोका निर्माण होईल, त्यामुळे
ननोन सोर्सकडून अ‍ॅप्स इन्स्टॉल करणे, टाळायला हवे.

वाचा :Jio चे ‘हे’ आहेत धमाकेदार रिचार्ज, २९९ ते २,९९९ पर्यंत किंमत, अनलिमिटेड कॉलिंगसह 912GB डेटाही मिळणार

4.ब्राउझरमधील संशयास्पद जाहिरातींवर टॅप करणे

4-

तुम्हाला अॅप्स आणि ब्राउझरवर दिसणार्‍या जाहिरातींवर टॅप करण्याची सवय असेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. जाहिराती जवळपास सर्व अॅप्स आणि वेबसाइट्सचा एक भाग आहेत आणि त्या डेव्हलपर आणि सामग्री निर्मात्यांसाठी उत्पन्नाचा सोर्स आहेत. पण काही अॅप्स आणि वेबसाइट्समधील जाहिरातीवर टॅप करणे धोकादायक असू शकते. ते तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हायरस ठेवू शकतात.

वाचा : AC Care : एसीची कुलिंग घरबसल्या वाढवा, फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो


5. अ‍ॅप्सना अनावश्यक परवानग्या देणे

5-

कोणत्याही अ‍ॅपला अनावश्यक परवानग्या देणे धोकादायक ठरू शकते. तुम्ही एखादे अॅप इंस्टॉल करता तेव्हा ते परवानग्या विचारते आणि अनेक पॉप-अप दाखवते. उदाहरणार्थ, गॅलरी अ‍ॅप तुमच्या फोटोंचा अ‍ॅक्सेस विचारेल किंवा मेसेजिंग अ‍ॅप तुमच्या संपर्कांमध्ये अ‍ॅक्सेस मागेल. आतापर्यंत ते ठीक आहे पण गॅलरी अॅप तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये प्रवेश मागू लागला तर ते योग्य नाही. अनेक अॅप्स तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी परवानग्या वापरतात. अशा परिस्थितीत, परवानगी देताना, आपण देत असलेल्या परवानगीची आपल्या अॅपला आवश्यकता आहे की नाही हे तपासावे, नाहीतर तुमचा फोन हॅक होऊ शकतो.​वाचाः HD अमोलेड डिस्प्लेच्या Amazfit Cheetah सीरीजच्या दोन स्मार्टवॉच लाँच, पाहा किंमत

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.