Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अभिमानास्पद! महाराष्ट्रातील अवघ्या ७ वर्षीय मुलाने सर केलं युरोपातील सर्वात मोठं शिखर

17

हायलाइट्स:

  • भारतीयांनी इतिहास घडवला
  • युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस केलं सर
  • सोलापूरमधील ७ वर्षीय मुलाचाही समावेश

सोलापूर : युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस हे सर करून ४ भारतीयांनी इतिहास घडवला आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३६० एक्सप्लोरर टीम मार्फत सोलापूरमधील ७ वर्ष ३ महिन्यांचा कुशाग्र वागज यानेही हे शिखर सर केलं आहे.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी नेतृत्व केलेल्या या मोहिमेत अनेक विक्रम झाले असून २०१४ व २०२१ साली एलब्रूस शिखरावर यशस्वी चढाई करून २ वेळा एलब्रूस सर करणारे प्रथम महाराष्ट्रीयन होण्याचा मानही आनंद बनसोडे यांना मिळाला आहे. मुंबई येथील शरद कुलकर्णी, उत्तराखंड पोलीस मधील राजेंद्र नाथ सिंग यांनीही आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली माऊंट एलब्रूस शिखर सर केले आहे.

चिंतेत वाढ; राज्यात करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या वाढली; मात्र ‘हा’ दिलासाही!

डॉ. हर्षद वागज यांनी १७ हजार फूट चढाई केली आहे. “स्टे स्ट्रॉंग अफगाणिस्तान” चा संदेश देत आनंद बनसोडे यांनी दुसऱ्यांदा माऊंट एलब्रूस शिखरावर भारतीय संविधानाची प्रतिमा नेऊन लोकशाहीचा पुरस्कार केला आहे. कुशाग्रच्या मार्फत शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी मूर्ती नेऊन भगवाही फडकवण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी चढाई करण्यासाठी गेलेली ही टीम वादळामुळे ४ दिवस १३ हजार फूट उंचीवर अडकून पडली होती. १७ ऑगस्ट रोजी चांगले वातावरण मिळताच या टीमने चढाई करत हे यश मिळवलं आहे.

कसं आहे माऊंट एल्ब्रूस?

युरोपमधील सर्वोच्च शिखर माऊंट एल्ब्रूस या शिखराची उंची १८ हजार ५१० फूट असून काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्या मध्ये हे शिखर वसलेलं आहे. जॉर्जिया देशाच्या बोर्डरपासून २० किमी अंतरावर माऊंट एल्ब्रूस शिखर असून पृथ्वीवरील सर्वात उंच असेल्यापैकी एक असा हा निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. याचे तापमान उणे २५ डिग्रीपर्यंत जात असते. वर्षभर सतत सुरू असलेली मोठ-मोठी वादळे, हाडे गोठवणारी थंडी इ. माऊंट एल्ब्रूस चढाईतील अडचणी आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.