Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयफोन युजर्सना कंपनी देणार प्रत्येकी 5000 रुपये; जाणून घ्या नियम व अटी

6

अ‍ॅप्पल आता आयफोन युजर्सना त्यांचे डिवाइस स्लो केल्याबद्दल नुकसान भरपाई देण्यास सुरुवात करणार आहे. पाच वर्षांपूर्वी आयफोन युजर्सनी कंपनी विरुद्ध तक्रार केली की त्यांचे iPhone 6, iPhone 7 आणि iPhone SE मुद्दामहून स्लो केले जात आहेत. कंपनीनं देखील हे मान्य केलं परंतु त्यामागे कंपनीचा वाईट हेतू नसल्याचं देखील सांगितलं. २०२० मध्ये कंपनीनं कायदेशीर लढाई टाळण्यासाठी ५०० दशलक्ष डॉलर्सची नुकसान भरपाई देण्याचं मान्य केलं.

रिपोर्ट्सनुसार आता कंपनीनं फोन स्लो झाल्यामुळे नाराज झालेल्या ग्राहकांना पैसे देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आयफोन युजर्सना प्रत्येकी ६५ डॉलर्स दिले जातील जे ५००० भारतीय रुपयांच्या आसपास रूपांतरित होतात. त्यामुळे हा अखेरीस संपण्याची चिन्हे दिसत आहेत.

वाचा : १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या फोनची लाँच डेट ठरली; Realme 11 5G आणि 11X 5G येत आहेत भारतात

२०१६ मध्ये अ‍ॅप्पलनं मान्य केलं होतं की ते जुन्या आयफोन्सना मुद्दामहून स्लो करत आहेत. परंतु त्यांनी असं फोन अचानक बंद होऊ नयेत म्हणून केलं होतं, त्यात काही वाईट हेतू नव्हता. परंतु सर्वच तक्रारकर्त्यांना हे स्पष्टीकरण मान्य नव्हतं आणि त्यांनी २०१८ मध्ये कायदेशीर लढाईची तयारी केली होती. तर २०२० मध्ये अ‍ॅप्पलनं सर्व ग्राहकांना मिळून ३१० ते ५०० मिलियन डॉलर्सची नुकसान भरपाई देण्याचं मान्य केलं. पुढील आयफोनचे युजर्सना ही समस्या भेडसावत होती. :

  • iPhone 6
  • iPhone 6 Plus
  • iPhone 6s
  • iPhone 6s Plus
  • iPhone SE
  • iPhone 7
  • iPhone 7 Plus

वाचा: 10000mAh बॅटरी, 16 GB रॅमसह Xiaomi Pad 6 Max लाँच, पाहा किंमत आणि सर्व फीचर्स

कोणाला मिळणार नुकसान भरपाई?

जर तुमच्याकडे आयफोन ६, ७ किंवा एसईचा पहिला मॉडेल असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. परंतु जर तुम्ही ६ ऑक्टोबर २०२० पूर्वी ह्या नुकसान भरपाईची मागणी केली नसेल तर ती तुम्हाला मिळणार नाही. कारण कंपनीनं ह्यासाठी एक वेबसाइट बनवली होती जिथे सिरीयल नंबरसह नुकसान भरपाईची मागणी करायची होती. तिथे तुम्ही बँक किंवा चेक द्वारे आपली नुकसान भरपाई मागू शकत होता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.