Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्र तलाठी भरती पेपरफुटी प्रकरण उच्च न्यायालयात; स्पर्धा परीक्षा समन्वय समितिच्या ‘या’ मागण्या
तलाठी भरती परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विविध विद्युत उपकरणांच्या मदतीने ऑनलाइन तलाठी परीक्षेचा पेपर फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला. २१ ऑगस्ट २०२३ रोजी परीक्षेच्या पाचव्याच दिवशी ऑनलाइन परीक्षेदरम्यान, परीक्षा सुरू होण्याआधीच सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना वाट पाहायला लागली. त्यानंतर, २३ ऑगस्ट २०२३ ला वर्धा जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर, केंद्रावरील कर्मचाऱ्यानेच पेपर फोडल्याचा आरोप परीक्षार्थी उमेदवारांकडून केला गेला होता. तर आज, २८ ऑगस्ट २०२३ ल मुंबईतील पवई आयटी पार्क या परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.
तलाठी परीक्षेचे पेपर फुटल्याने एकच गोंधळ निर्माण झालेला होता. या प्रकरणी आता स्पर्धा परीक्षा समन्वय समिती हायकोर्टात जाणार आहे. भरती प्रक्रियेत खंड न पाडता स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी Spardha Pariksha Samanvaya Samiti (SPSS) च्या वतीने हायकोर्टात केली जाणार आहे. तलाठी भरती परीक्षेमध्ये हायटेक कॉपी प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचे प्रकार आणि उशिरा परीक्षा सुरु झाल्याचे प्रकार घडले होते.
तलाठी परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करावी, या मागणीसठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती उच्च न्यायालयात जाणार आहे. भरती प्रक्रिया सुरु ठेवून चौकशी व्हावी आणि त्याचा अहवाल १० ते १५ दिवसांमध्ये द्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. याशिवाय एसआटी नेमण्याचीही मागणी याद्वारे करण्यात येणार आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या म्हणण्यानुसार, तपस यंत्रणांकडून सदर कॉपी प्रकरणावर कार्यवाही झाली असली तरी, हे प्रकरण परीक्षेच्या पहिल्या सत्रातच बाहेर आल्यामुळे इतर सत्रांमध्येही पेपर फुटीचे प्रकार घडले असू शकल्याचा संशय त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. शिवाय, या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे का हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. त्यामुळे, मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरासंदर्भात याचिका दाखल करायच्या तयारीत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती करणार या मागण्या :
० सदर कॉपी प्रकरणाच्या चौकशीसाठी समितिची स्थापना करावी.
० या चौकशीचा अहवाल किमान दहा ते पंधरा दिवसांमध्ये सादर करावा.
० कॉपी प्रकरणाची चौकशी सुरू असताना तलाठी भरती परीक्षा काही दिवसांसाठी स्थगित करावी.
० चौकशीचा अहवाल आल्यानंतर परीक्षा पुन्हा सुरू करावी.