Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

4 कॅमेरे, दोन डिस्प्ले! Xiaomi MIX Flip फोन आयएमआय सर्टिफिकेशनवर दिसला, लवकरच येऊ शकतो बाजारात

98

फोल्डेबलसह फ्लिप फोन देखील लोकप्रिय होत आहेत. म्हणूनच सॅमसंगनंतर मोटोरोला, ओप्पो आणि विवो सारख्या कंपन्यांनी ह्या कॅटेगरीमध्ये स्मार्टफोन लाँच केले आहेत. तर आता बातमी आली आहे की शाओमी देखील एक नवीन फ्लिप डिवाइस Xiaomi MIX Flip नावानं बाजारात सादर करू शकते, जो आता आयएमआय सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. चला जाणून घेऊया ह्या लिस्टिंग मधून समोर आलेली माहिती.


Xiaomi MIX Flip आयएमआय लिस्टिंग

शाओमीचा नवीन फ्लिप फोन आयएमआय डेटाबेसवर 2311BPN23C मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. ह्या मॉडेलचे नाव मिक्स फ्लिप असेल हे देखील इथूनच समजलं आहे. ह्या व्यतिरिक्त डिवाइसची इतर कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु Xiaomi MIX Flip ची काही वैशिष्ट्ये टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं शेयर केली आहेत.

वाचा: सॅमसंग फोन्स स्वस्तात विकत घेण्याची संधी, Galaxy A54 5G आणि A34 5G वर मिळत आहे खास डिस्काउंट

Xiaomi MIX Flip फोनचे संभाव्य फीचर्स

Xiaomi MIX Flip फ्लिप फोनचे स्पेसिफिकेशन लिस्टिंगमधून आले नाहीत परंतु हा डिवाइस अलीकडेच आलेल्या Samsung Galaxy Z Flip 5, Motorola Razr 40 आणि Oppo Find N3 Flip ला टक्कर देऊ शकतो, अशी चर्चा आहे. टिपस्टरनुसार फोनमध्ये कंपनी दमदार परफॉरमंस आणि शानदार कॅमेरा एक्सपीरियंसचं मिश्रण देऊ शकते. फोनबद्दल लीकमध्ये सांगण्यात आले आहे की Xiaomi MIX Flip खूप हलका आणि पातळ डिवाइस असू शकतो.

वाचा: रियलमीचा सर्वात स्वस्त 5G Phone! ५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह Narzo 60x 5G ची एंट्री

यात युजर्सना क्वॉलकॉम स्नॅपड्रेगन ८ जेन ३ प्रोसेसर मिळू शकतो. तर फोटोग्राफीसाठी कंपनी ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह देऊ शकते, ज्यात 3X ऑप्टिकल झूम असलेला टेलीफोटो सेन्सर दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे ह्या डिवाइसची एंट्री साल २०२४ च्या सुरवातीला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.