Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाबळेश्वर हायवेवर दिसले २ वाघ, आनंद महिंद्रांनी थरारक व्हिडिओला दिलं भन्नाट कॅप्शन

15

हायलाइट्स:

  • महाबळेश्वर हायवेवर दिसले २ वाघ
  • आनंद महिंद्रांनी थरारक व्हिडिओला दिलं भन्नाट कॅप्शन
  • सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. जगभरातून व्हायरल होणारे अनेक आकर्षक व्हिडिओ ते खास कॅप्शनसह नेहमीच त्यांच्या ट्विटर आणि सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतात. आताही आनंद महिंद्रा यांनी आकर्षक असा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्विट केला. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चांगली चर्चा रंगत आहे. ( 2 tigers spotted on Mahabaleshwar highway Anand Mahindra gave a thrilling video caption)

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं असून ते प्रचंड व्हायरल होतं आहे. त्यांनी महाबळेश्वर जवळच्या पाचगणीमध्ये रस्त्यावर दोन वाघ दिसल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. आणि त्याच्यावर त्यांनी मजेशीर कॅप्शनही केलं आहे. ‘तर हायवेवर फक्त आमची एक्सयूव्ही ही एकमेव बीग कॅट नाहीये. भन्नाट आहे हे.’ असं त्यांनी ट्वीट शेअर करताना लिहलं आहे.

खरंतर, आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पाचगणीत रस्त्यावर दोन वाघ दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. पण महिंद्रा यांनी हायवेवर फक्त आमची एक्सयूव्ही कार नाही तर वाघही दिसतात अशा अर्थाने ट्वीट केलं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पाचगणीच्या मार्गावर रात्रीच्या वेळी वाघ दिसल्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.

एक वाघ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपातून बाहेर रस्त्यावर आला आणि त्यानंतर दुसरा बाजूला उभ्या असलेल्या बाईकपर्यंत येऊन पुन्हा तिथून तो बाहेर आला त्या दिशेला निघून गेला. यावेळी गाडीतले सगळे शांत बसले असून मागे जाण्याचं ऐकमेंकांना सांगत होते. ( 2 tigers spotted on Mahabaleshwar highway Anand Mahindra gave a thrilling video caption)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.