Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.१० :- पुण्यातील येरवडा परिसरातील आडे यांच्या नावावर असलेली जमीन मुलीच्या नावावर करून द्यावी, यासाठी सासऱ्याने नातेवाइकांच्या मदतीने पुण्यातून जावयाचे अपहरण करून. पुण्यातून त्याला बळजबरीने गाडीत घालून थेट बीडला नेले व.बीडमध्ये एका घरात दोरीने हात-पाय बांधून डांबून ठेवले. याप्रकरणी जावयाने दिलेल्या फिर्यादीवरून सासऱ्यासह त्याच्या नातेवाइकांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
विनोद साहेबराव आडे (वय २५, रा. रामनगर, येरवडा) असे अपहरण झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनी येरवडा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, सासरे प्रकाश गेमा राठोड, चुलत सासरा रमेश गेमा राठोड यांच्यासह नातेवाईक मंगेश वडते, योगेश वडते, दादासाहेब राठोड, अशोक गेमा राठोड (सर्व रा. शाहूनगर तांडा, पोस्ट बंगाली पिंपळा, गेवराई, बीड) यांनी आडे यांची पत्नी आर्तिका यांच्या नावावर जमीन करून द्यावी यासाठी आडे यांचे अपहरण केल्याचे म्हटले आहे.