Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अनेकांना माहीत नसलेले ‘पेंट टेक्नॉलॉजीचे’ रंगीत विश्वही करिअरचा उत्तम पर्याय

10

Career In Paint Technology: रंगांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याच्या शाखेचा उपयोग अनेक व्यवसायांमध्ये केला जातो या तंत्राच्या अभ्यासाला ‘पेंट टेक्नॉलॉजी’ असे म्हणणात. रंग जरी आपल्याला आकर्षित करत असले तरी अनेक वेळा त्यांचा उपयोग एखाद्या गोष्टीचं संरक्षण करण्यासाठी केला जातो. खासकरून लोखंडी वस्तू गंजू नयेत, वातावरणाचा परिणाम वस्तूवर होऊ नये व वस्तू बऱ्याच काळापर्यंत टिकून राहाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर रंगांचा उपयोग होतो. मात्र या अभ्यासक्रमांविषयी फारच थोड्या लोकांना माहीत असते. या लेखात आपण ‘पेंट टेक्नॉलॉजी’मधील करिअर विषयी जाणून घेऊया.

‘पेंट टेक्नॉलॉजी (Paint Technology) म्हणजे काय?

पेंट टेक्नॉलॉजी ही केमिकल टेक्नॉलॉजी शाखेची उप-शाखा (Sub-Branch) आहे असे आपण म्हणू शकतो. केमिकल इंजिनीअरिंगशी संबंधित असणार्‍या या क्षेत्रामधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून, भारतामधील काही मोजक्याच पण नामांकित संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

‘पेंट टेक्नॉलॉजी’च्या अभ्यासामध्ये या गोष्टींचा समावेश :

  • पेंट टेक्नॉलॉजीमध्ये पेंट तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विविध घटकांचा आणि पद्धतींचा अभ्यास करतात.
  • पेंटमध्ये जाणार्‍या प्रत्येक घटकाच्या कार्यांचे रसायनशास्त्र आणि पेंट ज्या ठिकाणी किंवा ज्या पृष्ठभागावर लावला जाणार आहे त्यावर पेंटचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी Paint Technologist / Pain Expert आणि त्यानुसार बादल करण्याचे तंत्र या अभ्यासक्रमात शिकवले जाते.
  • विविध प्रकारच्या पेंट्सची निर्मिती, त्यांचा अभ्यास, साठवण्याची पद्धत याविषयी सखोल ज्ञान या अभ्यासक्रमांमधून दिले जाते.

(वाचा : B.Tech in Computer Science केल्यानंतर करिअर आणि नोकरीचे हे बेस्ट १० पर्याय; लाखो नव्हे, करोडोमध्ये कमवाल)पेंट टेक्नॉलॉजीमधील हे महत्त्वाचे विषय :

  1. Composition Characterization and Production of Lipids (लिपिडचे रचना वैशिष्ट्य आणि उत्पादन)
  2. Oil Characterization (तेलाचे वैशिष्ट्य)
  3. Expression and Extraction Techniques of Oil Bearing Materials (ऑइल बेअरिंग मटेरियलची एक्सप्रेशन आणि एक्सट्रॅक्शन टेक्निक्स)
  4. Process Economics, Utilities and by- products of Oil Industry (प्रक्रिया अर्थशास्त्र, उपयुक्तता आणि तेल उद्योगाची उप-उत्पादने.)
  5. Refining of oils (तेल शुद्धीकरण)
  6. Hydrogenation and Modification of oils (हायड्रोजनेशन आणि तेलांचे बदल)

शैक्षणिक पात्रता :

पेंट टेक्नॉलॉजीमध्ये B.Tech अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने किमान १० + २ किंवा विज्ञान विषयासह समतुल्य शिक्षण पूर्ण केलेले असणे आवशयक आहे.

B.Tech नंतर तुम्ही M.Tech ची निवड करू शकता.

बहुतेक संस्थांद्वारे केमिकल इंजिनिअरिंग च्या अभ्यासक्रमांमध्ये या विषयाचे समावेश करून घेण्यात आला आहे.

(वाचा : Career In AI Industry: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अवघे विश्व व्यापणार; येत्या काळात करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध)

ही कौशल्यही शिकवली जातात :

पेंट टेक्नॉलॉजी शिकणार्‍या विद्यार्थ्यांना ऑइल (oils), resins, पॉलिमर (polymers), pigments and dyes, organic solvents, paint additives, powder coatings, high solids coating, electro – coatings and other paint application techniques अशा विविध गोष्टी आणि तंत्राचे ज्ञान मिळते.

या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार :

० पेंट उद्योग हे एक भरभराटीचे क्षेत्र आहे जे प्रामुख्याने ऑटोमोबाईल आणि रिअल इस्टेट उद्योगावर अवलंबून आहे.
० त्यामुळे अशा उद्योजकीय डोमेनमध्ये पेंट टेक्नॉलॉजिस्ट आवश्यक आहे.
० शिवाय, विविध पेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये संशोधन आणि विकास, गुणवत्ता तपासणी, उत्पादन, विपणन आणि क्लायंट साइटवर काम करणारे तांत्रिक सहाय्यक/कार्यकारी म्हणून कामाची संधी मिळू शकते.

मिळणार एवढा पगार :

० या क्षेत्रातील पगार तुमच्यातील कौशल्य आणि या क्षेत्रातील अनुभवावर अवलंबून असतो.
० या क्षेत्रात कामाची सुरवात करणार्‍याला सव्वा ते २ लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. जर एखाद्याला नामांकित ब्रँडमध्ये नोकरी मिळाली तर पगारचा हा आकडा मोठा सू शकतो.
० अनुभव मिळाल्यानंतर पगार चांगला मिळतो शिवाय,वरिष्ठ पातळीवर काम करण्याची संधीही मिळते.

भारतात पेंट टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी…

  • बी.टेक. पेंट टेक्नॉलॉजी : इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT)
  • डिप्लोमा इन पेंट अ‍ॅप्लिकेशन टेक्नॉलॉजी : गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट
  • एम.टेक. पेंट टेक्नॉलॉजी : लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर
  • पेंट आणि वार्निश तंत्रज्ञान: औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा, कोलकाता
  • बी.टेक. पृष्ठभाग कोटिंग तंत्रज्ञान- लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर
  • एम.टेक. सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी- इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबई (महाराष्ट्र)

(वाचा : दिवसाला लाख-सव्वा लाख रुपये कमवायचे आहेत..? मग, हे काम तुमचेही आयुष्य बदलणारे ठरेल)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.