Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातलेला ‘जवान’ दुसऱ्या आठवड्यात मात्र थंड, कमाईत झाली इतकी घट

12

मुंबई– शाहरुख खान, विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्या ‘जवान’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. अवघ्या आठवडाभरात अॅटली दिग्दर्शित या चित्रपटाने अनेक मोठे रेकॉर्ड मोडले आहेत. ५७ वर्षीय शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर धमाकेदार अ‍ॅक्शन करताना पाहून त्याचे सगळेच चाहते झाले आहेत. साऊथ तडका असलेल्या या चित्रपटात किंग खानची दुहेरी भूमिका आहे. सस्पेन्स, अॅक्शन आणि आकर्षण यामुळे ‘जवान’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. अॅटली यांच्या ‘जवान’ चित्रपटाने दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच ८व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांची कमाई केली ते जाणून घ्या.

लोक म्हणाले, माझे सिनेमे चालणार नाहीत, आता ‘पठाण’मुळे मागची ४ वर्ष विसरलो | शाहरुख खान


सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, जवानाला ८ व्या दिवशी मोठा धक्का बसला. दुसऱ्या गुरुवारी चित्रपटाच्या व्यवसायात २२.४१ टक्क्यांची घट झाली. म्हणजेच सातव्या दिवसाच्या तुलनेत ‘जवान’ची कमाई २३ कोटींवरून १८ कोटींवर घसरली आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक अजूनही ‘जवान’ सोबतच महिन्याभरा पूर्वी रिलीज झालेल्या सनी देओलचा ‘गदर २’ पाहण्यासही पसंती देत आहेत.

दारु पिणं, मंडपात पत्ते खेळणं बंद झालं पाहिजे! वडिलांचे झालेले हाल आठवून मिलिंद गवळी भावुक
‘जवान’चे आत्तापर्यंतचे एकूण कलेक्शन

‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर एक आठवडा पूर्ण केला आहे. ७ सप्टेंबरला रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या चित्रपटाने या ८ दिवसांत एकूण ३८६.२८ कोटींचा व्यवसाय केला आहे. सर्वाधिक कमाई हिंदीतून झाली आहे. ‘जवान’ने हिंदीमध्ये ३४५.८८ कोटी, तमिळमध्ये २३ कोटी आणि तेलुगूमध्ये १७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

‘जवान’चे जगभरातील कलेक्शन

रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरखाली बनलेल्या ‘जवान’च्या जगभरातील कलेक्शनबद्दल सांगायचे तर, या एका आठवड्यात त्याने ६६० कोटींचा आकडा पार केला आहे. या दमदार कमाईसोबतच जवानने इतरही अनेक विक्रम केले आहेत.
मी प्रेमात पडले होते आणि म्हणून… प्राजक्ताने सांगितलं फार्म हाऊस खरेदी करण्यामागचं खरं कारण
जवानने हे रेकॉर्ड केले –

  • हिंदी चित्रपटातील ओपनिंग डेचे सर्वाधिक कलेक्शन
  • पहिल्या आठवड्यात हिंदीत सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट
  • २०२३ चा तिसरा सर्वात मोठा चित्रपट
  • अॅटलीचा सर्वात मोठा चित्रपट
  • ३०० कोटी क्लबमध्ये सर्वात जलद सामील होणारा चित्रपट (५ दिवसांत)
  • तीन दिवसांत २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट
  • टॉप ओपनिंग वीकेंड फिल्म

जवानाचे बजेट आणि कलाकार

शाहरुख खान व्यतिरिक्त ‘जवान’ मध्ये दीपिका पादुकोण, नयनतारा, सान्या मल्होत्रा, लहर खान, प्रियामणी, एजाज खान आणि विजय सेतुपती सारखे कलाकार आहेत. अॅटलीने सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट बनवला आहे. पण अवघ्या आठवडाभरातच या चित्रपटाने बजेटपेक्षा दुप्पट कमाई करत ब्लॉकबस्टरचा किताब पटकावला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.