Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रेडमीचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय उद्या; परवडणाऱ्या किंमतीत Redmi Note 13 Series लाँचसाठी सज्ज
Redmi Note 13 सीरीज लाइव्ह इव्हेंट
Redmi Note 13 सीरीज उद्या २१ सप्टेंबरला चीनमध्ये सादर केला जाईल. नवीन मोबाइलसह अन्य डिवाइस इव्हेंटच्या माध्यमातून लाँच होतील. हे आयोजन स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. जर तुम्हाला हा कार्यक्रम पाहायचा असेल तर हा चिनी स्ट्रीमिंग साइट Weibo, अन्य लाइव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. तुम्ही देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून देखील इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकता.
हे देखील वाचा: आयपॅडला टक्कर देण्यासाठी वनप्लस सज्ज; परवडणाऱ्या किंमतीत OnePlus Pad Go टॅबलेटची होऊ शकते एंट्री
रेडमी नोट 13 सीरीजचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
रेडमी नोट 13 सीरीजच्या स्मार्टफोन्समध्ये ६.६७ इंचाचा १.५के ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्यावर १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २७१२×१२२० पिक्सल रिजॉल्यूशन मिळू शकतो.
रेडमी नोट १३ सीरीजच्या टॉप मॉडेलमध्ये Dimensity 7200 Ultra मिळणार हे कंफर्म आहे. तर नोट १३ प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन ७ जेन १ चिपसेट दिला जाईल. त्याचबरोबर १६जीबी पर्यंत रॅम आणि १टीबी परंतु स्टोरेज मिळू शकते. नोट १३ आणि प्रो मध्ये ५१२०एमएएच बॅटरीसह ६७वॉट फास्ट चार्जिंग आणि नोट 13 प्रो प्लस मध्ये १२०वॉट फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.
हे देखील वाचा: १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत कर्व्ड AMOLED डिस्प्ले असलेला दमदार फोन; लवकरच येईल Itel S23+
रेडमी नोट 13 सीरीज फोन्स ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतील. ह्यातील टॉप आणि प्रो मॉडेलमध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलची तिसरी लेन्स दिली जाऊ शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.