Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे जिल्ह्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारे शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. या संदर्भातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. या नुसार पुणे जिल्ह्यातील शाळांची सत्य परिस्थिती समोर आली असून या अहवालावर हरकती, सूचना नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेने दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा अंतिम अहवाल जाहीर केला जाईल.
या मूल्यांकन प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील एकूण ७९९ शाळांचे मूल्यांकन केले गेले. ज्याची आकडेवारी टक्क्यांमध्ये देण्यात आली आहे. या मूल्यांकनात केवळ २३.२७ टक्के शाळा उत्तीर्ण झाल्या आहेत तर ७६.७२ टक्के शाळा अनुत्तीर्ण ठरल्या आहेत. यामध्ये केवळ सहा शाळांना ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले असून या टक्क्यांच्या आधारे शाळांची स्तरनिश्चिती करण्यात आली आहे. पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यामध्ये माध्यमिक शाळांची ही दुरवस्था समोर आल्याने आता शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
(वाचा: TIFR Mumbai Recruitment 2023: टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विविध पदांची भरती, जाणून घ्या नोकरीची सविस्तर माहिती..)
शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारे तसेच शाळेच्या इतर शिक्षण आणि शिक्षणेतर उपक्रमांच्या आधारे मूल्यांकन करून स्तरनिश्चित करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने राबविला आहे. अत्यंत निकोप आणि निष्पक्षपाती हे मूल्यांकन करण्यात आले परंतु एकूणच शाळांचे वास्तव गंभीर असून गुणवत्ता ढासळल्याचे निदर्शनास आले आहे.
या शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत दिलेल्या निकषांनुसार तालुका आणि क्लस्टरनिहाय समित्या स्थापन केल्या होत्या. या समित्यांद्वारे शाळांचे गुणांकन करण्यात आले. त्यानुसार एकूण ७९९ शाळांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यापैकी ६१३ शाळा या मूल्यमापनात नापास झाल्या. त्यापैकी १४ शाळांना १ ते ५.९९ टक्के गुण मिळाले आहेत. तर ३४ शाळांना ६ ते १०.९९ टक्के गुण मिळाले आहेत. यावरून पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचा तर खालावल्याचे दिसते.
मूल्यांकनाचे निकष:
- पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल
- दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल
- नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल
- एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा
- इन्स्पायर ॲवॉर्ड सहभाग आणि निवड
- चित्रकला स्पर्धा (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट)
- राज्य व राष्ट्रीय कला, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा सहभाग
(वाचा: HQ Coast Guard Region NW Recruitment 2023: तटरक्षक दलाच्या उत्तर-पश्चिम मुख्यालयात भरती, आजच करा अर्ज!)